File Photo : Amit Shah
Jharkhand Vidhansabha Chunav Phase 1 Poll रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यात दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्यानुसार, आज (दि.13) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांना राज्यातील भ्रष्टाचार, घुसखोरी आणि तुष्टीकरण संपवण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान करा, असे आवाहन केले.
हेदेखील वाचा : Jharkhand Assembly Election Voting Live 2024 : झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; 683 उमेदवारांचे भवितव्य पणाला
झारखंडमधील विधानसभेच्या 43 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि माजी खासदार गीता कोरा यांच्यासह 683 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
झारखंड के पहले चरण में मतदान के लिए जा रहे सभी मतदाताओं से अपील करता हूँ कि वे भ्रष्टाचार, घुसपैठ व तुष्टीकरण मुक्त और विकसित झारखंड के निर्माण के लिए रिकॉर्ड मतदान करें। झारखंड में जनजातीय अस्मिता की रक्षा, महिलाओं की सुरक्षा, युवाओं को रोजगार के लिए बढ़-चढ़कर वोट करें। आज…
— Amit Shah (@AmitShah) November 13, 2024
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले की, ‘झारखंडच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना मी भ्रष्टाचार, घुसखोरीमुक्त विकसित झारखंड तयार करण्यासाठी विक्रमी मतदान करण्याचे आवाहन करतो. झारखंडमधील आदिवासी अस्मितेचे संरक्षण, महिलांची सुरक्षा आणि तरुणांना रोजगार यासाठी उत्साहाने मतदान करा. आज आधी रोटी-बेटी-माटीला मतदान करा, मग नाश्ता करा’.
पहिल्या टप्प्यात 43 जागांवर होतंय मतदान
कोडरमा, बरकाथा, बार्ही, बरकागाव, हजारीबाग, सिमरिया, चतरा, बहरगोरा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, इचगढ, सरायकेला, चाईबासा, माझगाव, जगन्नाथपूर, मनोहरपूर, चक्रधरपूर, खरसंपवा, खरसांग, ता. रांची, हटिया, कानके, मंदार, सिसाई, गुमला, विशुनपूर, सिमडेगा, कोलेबीरा, लोहरदगा, मनिका, लातेहार, पंकी, डाल्टनगंज, विश्रामपूर, छतरपूर, हुसेनाबाद, गढवा, भवनाथपूर यांसह इतर मतदारसंघात मतदान घेतले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची तयारी पूर्ण
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेतील पथकाला हवाई मार्गाने संवेदनशील भागात पाठवण्यात आले आहे. राज्यात सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : Raj Thackeray: ‘भविष्यात महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो’; चांदिवलीच्या सभेत राज ठाकरेंनी राजकारण्यांचे काढले वाभाडे
73 महिला उमेदवारांचाही समावेश
यामध्ये 73 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 43 जागांपैकी 17 सर्वसाधारण, तर 20 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 6 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.