भाजप नेते जालिंदर शेंडगे यांच्या तक्रारीनंतर इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. त्यापूर्वी राज्यामध्ये हालचालींना वेग आला आहे. अंतर्गत हालचाली व राजकारण सुरु आहे. यामध्ये आता मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगर पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्यापूर्वी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीचे मतदान (दि.20) बुधवारी पार पडले. त्यावेळी इम्तियाज जलील व भाजपचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांची बाचाबाची झाली. पंडित नेहरु महाविद्यालयातील बूथवर इम्तियाज जलील व शेंडगे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. भाजप नेते जालिंदर शेंडगे यांनी रात्री उशीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजप नेते जालिंदर शेंडगे व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. या यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये झालेल्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तक्रारीमध्ये लिहिले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरु असताना इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांसह तेथे आले. त्यांनी मतदारांना धमकावण्यास सुरु केले. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता मला जातीवाचक शिवीगाळ करुन अंगावर धावून आले. लाथाबुक्यांनी मारहाण केली. उपस्थित लोकांनी मला सोडवले, अशी तक्रार भाजप सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी केली आहे. या तक्रारीनुसार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इम्तियाज जलील इम्तियाज जलील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
इम्तियाज जलील यांनी निवडणुकीच्या मतदानानंतर पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला होता. इम्तियाज जलील यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतुल सावे यांच्याकडून दलित आणि मुस्लिम भागात पैशांचे वाटप करून त्यांना मतदानापासून रोखल्याचा आरोप केला होता. तसेच या विषयीचा व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला होता. भाजपवर आणि अतुल सावे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील विरुद्ध भाजपचे अतुल सावे अशी लढत होती. आता उद्या (दि.23) येणाऱ्या निकालामध्ये कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.