File Photo : BJP
नंदूरबार : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अनेक नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. असे असताना आता ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण, राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपमधून बाहेर पडत त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
हेदेखील वाचा : महायुती असो वा महाविकास आघाडी सर्वच पक्षांचे उमेदवार देताहेत घरोघरी भेटीगाठी; आता प्रचाराला दणक्यात सुरुवात
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डॉ. गावित इच्छुक होत्या. मात्र, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच, त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामाही पक्षाकडे दिला आहे. डॉ. गावित यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अक्कलकुवातून डॉ. गावितांची बंडखोरी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (दि.4) शेवटचा दिवस होता. त्यात अक्कलकुवातून डॉ. हिना गावित यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धारच केला आहे. त्यानुसार, त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपमधून बाहेर पडत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. गावित यांना मानणारा मोठा वर्ग
डॉ. हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यामागे भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता गावितांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारीही भाजप सोडून जाणार की पक्षातच राहणार हे आता लवकरच समजणार आहे.
अनेक उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात
30 नोव्हेंबरला अर्ज छानणीनंतर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चिंत झाले. त्यांनी जोरकसपणे प्रचार सुरू केला. पक्षाने उमेदवारी घोषित केली तेव्हापासूनच काही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला होता. त्याला आता वेग आला आहे. दक्षिण पश्चिममध्ये भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, वंचितचे विनय भांगे, बसपचे सुरेंद्र डोंगरे, पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे ओपुल तामगाडगे यांनी घरोघरी प्रचार आरंभला आहे.
हेदेखील वाचा : पुण्यात आघाडीत बिघाडी; शहरातील ‘या’ मतदारसंघात बंडखाेर उमेदवारांची माघार नाही