गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कराडमध्ये सभा (फोटो- ट्विटर)
कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.दरम्यान महायुतीच्या उमेदवारासाठी आलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बॅग तपासणीवरून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. वणी,औसा आणि गोवा-महाराष्ट्र बॉर्डरवर उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी करण्यात आली. त्यावरून ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. मात्र त्यानंतर अनेक नेत्यांच्या बॅग्स तपासल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर याबाबत चांगलाच वादंग झाला होता. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत तपास यंत्रणा, तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, कराड विमानतळावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही बॅग तपासण्यात आली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री, तसेच वरिष्ठ नेत्यांच्या बॅग तपासणीवरून चांगलेच आरोप, प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बुधवारी कराड दौऱ्यावर आले होते. ते गुरुवारी गोव्याकडे रवाना होण्यापूर्वी कराड येथील विमानतळ परिसरात निवडणुक यंत्रणेकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
महायुतीने केलंय काम भारी, आता पुढची तयारी!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी कराड दक्षिण आणि कराड उत्तर चे भाजप महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्री मनोज घोरपडे आणि @Dr_Atul_Bhosale यांच्या प्रचारासाठी कराड येथे डॉक्टर आणि समाजातील इतर घटकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी… pic.twitter.com/4TSReCzPZl
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 13, 2024
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे प्रचाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना बॅग तपासण्यात आली होती. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी टीका केली.
हेही वाचा: काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…! फडणवीस अन् गडकरींची बॅग चेकिंग; विरोधकांना सुनावले खडेबोल