स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून त्यानंतर आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला आहे.
स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून महापुरामुळे हाहाकार माजला आहे. व्हॅलेन्सिया प्रांतात आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८ तासांत वर्षभराच्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. या चक्रीवादळाने स्पेनच्या भूमध्य सागरी किनाऱ्याचा बराचसा भाग व्यापला असून अनेक बेपत्ता झाले आहेत.
हेही वाचा-Navi Mumbai | विजय चौगुले यांचे गणेश नाईकांच्या विरोधात ऐन निवडणुकीत आंदोलन
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहने वाहून गेली आहेत. त्यामुळे या प्रांतातील संपूर्ण जीवन विस्कळीत झालं आहे. वाहने आणि रेल्वे मार्ग बाधित झाले आहेत. पाण्याचा जोर इतका होता की, वेलेंसिया शहरातील एक प्रमुख पूल उद्धवस्त झाला आहे . घरं आणि इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: माद्रिद आणि बार्सिलोना येथे बऱ्याच ट्रेन्स आणि इतर आवश्यक सेवा सुद्धा रद्द करण्यात आल्या.
हेही वाचा-पंजाब सरकारकडून दिवाळीचे बंपर गिफ्ट; कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. पोलिसांनी हेलीकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पुरात अडकलेल्या वाहनचालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोहचण्यासाठी जहाजांचा वापर केला जात आहे. स्पेनमधील प्रत्येक नागरिक मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत सहभागी आहे. आपल्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्यांच्या वेदना आम्ही समजू शतको. परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व आवश्यक साधने वापरली जातील, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. स्पेनमध्ये पूर आणखी काही काळ धोका निर्माण करू शकतो. काही भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे आणि प्रशासन सतत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.
लेतूर शरातील पूर येऊन ओसरल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मलबा हटवण्याचे काम करत आहे. पोलीस आणि बचाव पथकांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचण्यासाठी रबर बोटीचा वापर केला. स्पेनच्या आपत्कालीन प्रतिसाद युनिटमधील १ हजाराहून अधिक सैनिक पूरग्रस्त भागात नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. लेतूरमधील बचाव कार्यात बचवलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत देत आहेत.
स्पेनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र दुष्काळ ते विक्रमी तापमान अशा विविध हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ज्याचा संबंध शास्त्रज्ञ हवामान बदलाशी जोडत आहेत. पुरामुळे माद्रिद आणि बार्सिलोना शहरांकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्पेनमधील व्हॅलेन्सियामध्ये लोक पूरग्रस्त रस्त्यावरून चालताना. विशेषत: दुर्गम भागात शोधकार्य सुरूच असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.