नवराष्ट्र महाराष्ट्र महाQuiz मध्ये व्हा सहभागी
महाराष्ट्रातील राजकारण हे प्रत्येक घडीला बदलत असते आणि सध्या बदलाच्या वारे जास्त जोरात वाहू लागले आहेत कारण सर्वात जास्त चर्चेत असणारी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अगदी तोंडाशी येऊन पोहचली आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदार मतदान देण्यास सज्ज झाला आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी याचा निकाल लागणार असून आता कोणता पक्ष शासन स्थापणार याकडे जनतेचे लक्ष सध्या आहे.
महायुती की महाआघाडी सरकार असा सामना यावेळी रंगलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवभारत – नवराष्ट्रने आपल्या वाचकांसाठी ‘महाराष्ट्र महाक्विझ’ आणण्याचा निर्धार केला आहे आणि पुढील 15 दिवस वाचकांसाठी ही प्रश्नमंजुषा सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत.
कशी असेल प्रश्नमंजुषा
तुम्हाला आमच्या नवराष्ट्र आणि नवभारत या वृत्तपत्रात आणि अगदी डिजीटल साईटवरदेखील अनुक्रमे navabharatlive.com आणि navarashtra.com यावर होम पेजवर प्रश्न दिसून येईल. रोज अनुक्रमे एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. तसंच याचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला पर्यायही तिथे उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्हाला त्यातील योग्य पर्याय निवडून आपले सध्याच्या राजकीय घडामोडींवरील ज्ञान सांगायचे आहे आणि उत्तर निवडायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमधून विजेते निवडले जाणार आहेत आणि त्यांची नावेही वृत्तपत्रं आणि डिजीटल साईटवरून प्रकाशित करण्यात येणार आहेत.
कधी द्याल उत्तरं
या प्रश्नमंजुषेतील सर्व प्रश्न हे विधानसभा निवडणुकीशी संबंधितच असणार आहेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्रश्नाचे उत्तर किती वेळात द्यायचे तर तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता आणि डिजीटल साईटवर Submit करू शकता. रोजच्या विजेत्यांची नावं तुम्हाला लकी ड्रॉ काढल्यानंतर वृत्तपत्रं आणि डिजीटल साईटवरून पाहता येतील. विजेत्यांना फोन करून त्याची माहिती देण्यात येईल.
ही संधी वाचकांनी अजिबात दवडू नका आणि त्वरीत या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा. या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी तुम्ही https://www.navarashtra.com/quiz या लिंकवर क्लिक करावे आणि प्रश्नांची उत्तरं द्यावीत