सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी (फोटो सौजन्य-X)
Sameer Bhujbal vs Suhas Kande marathi: विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. याचदरम्यान मतदानाला सुरुवात होत नाहीतोच नांदगावमध्ये राडा झाला. नाशिकमधील नांदगावमध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे समोरा समोर आले. सुहास कांदे हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला. याठिकाणी हाणामारीच्या घटना ही समोर आल्या आहेत.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झालाय. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना थेट जीव मारण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे हे समीर भुजबळांना संतापून म्हणाले.
सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही. असा पवित्रा भुजबळांनी घेतला. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर दिसले. अआज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काही काळ समीर भुजबळानी यांना अडवुन ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर अपक्ष यादीत 2 हजार 086 उमेदवार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचं हे लवकरच स्पष्ट होणार आहे.