File Photo : Election
मुंबई : विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, अनेक इच्छुकांनी आपापल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात महाराष्ट्रात बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून, सोमवारी अर्थात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांना धक्का; ‘या’ नेत्याने सोडली राष्ट्रवादीची साथ, आता करणार…
निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल देखील केला आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय पक्षांकडे केवळ एक दिवस उरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित होते. सूत्रांनुसार, या बैठकीत असे ठरविण्यात आले आहे की, पक्षाची पर्वा न करता निवडणूक अर्ज भरलेल्या उमेदवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी मान्य केल्यास दंड अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अशा काही उमेदवारांना मुख्यमंत्री समज देतील. शिंदे गटाचे सुमारे 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, नावे मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.
तर महायुतीबाबत बोलायचे झाले तर असे जवळपास 35 नेते बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत. आता आघाडीचे निवडणूक प्रभारी बंडखोरांची मनधरणी करण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांचे अर्ज वेळेत मागे न घेतल्यास निवडणुकीत महायुतीची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे महायुतीकडून बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यात येत आहे.
महायुतीत ‘या’ जागांवर तिढा कायम
पाचोरा मतदारसंघातून भाजपचे अमोल शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. बंडखोरीचा पवित्रा घेत अतुल शहा यांनी मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. माहीम मतदारसंघावर लक्ष केंद्रीत महायुतीमध्ये सर्वात मोठी अडचण माहीम मतदारसंघात आहे. या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे.
हेदेखील वाचा : एका नेत्याची टीका तर दुसऱ्या नेत्याची भेट; अजित पवार गटाची मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भूमिका तरी काय?