काय घडलं नेमकं?
पाचवीत शिकणारा प्रथमेश राहुल पाटील हा मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. तो मंगळवेढा येथे शाळेसाठी नियमित आत असतो. शनिवारी सकाळी त्याच्या पालकांनी त्याला शाळेत सोडलं. शाळा सुटल्यानंतर प्रथमेश घरी येत असतांना तो मंगळवेढ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या 9405 क्रमांकाच्या एसटी बसमधून प्रवास करीत होता. मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील दामाजी कारखाना पाटीच्या पुढे एसटी बस आल्यावर कंडक्टरने पास मागितला. यावर प्रथमेशने दप्तरामध्ये असणारा पास शोधला. मात्र यानंतर त्याच्या लक्षात आले की आपला पास घरीच राहिला आहे. त्याने कंडक्टरला पास घरी राहिल्याचे सांगितले. त्यांनतर कंडक्टरने पैसे देऊन तिकीट काढण्याचे सांगितले. मात्र प्रथमेशकडे पैसेही नव्हते.
Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत
त्याने तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा…ते तुम्हाला पैसे पाठवून देतील…अशी कंडक्टरला त्याने विनवणी केली. मात्र असं न करता एसटी बसच्या कंडक्टरने मंगळवेढा सोलापूर हायवेवरच एसटी थांबवून प्रथमेशला बसच्या खाली उतरवले. जवळ पैसे नाही… पासही नाही… अश्या परिस्थिती हायवेवर उतरलेला प्रथमेश घाबरला. त्याला रडू कोसळले. त्याने रस्त्यावरील वाहनांना हात दाखवला आणि आपले मूळगाव असणाऱ्या ब्रह्मपुरीपर्यंत दुचाकीवर जाऊन पोहोचला.
प्रवाशाने केली विनंती तरीही…
एसटी बसमध्ये प्रथमेशच्या बाजूला एक महिला प्रवाशी बसली होती. तिने माझ्याजवळ माझ्या तिकिटाव्यतिरिक्त केवळ 15 रुपये आहेत. हे पैसे घ्या आणि चिमुकल्याला प्रवास करू द्या. अशी विनंती कंडक्टरला केली. मात्र या विद्यार्थ्याच्या प्रवासासाठी अजून ११ रुपये कमी पडतात. असं सांगत कंडक्टरने महिला प्रवाशाचीही विनंती नाकारली.
प्रथमेश घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेली सगळी घटना आपल्या वडिलांना सांगितली. यांनतर तात्काळ पालकांनी मंगळवेढा आगार प्रमुखांकडे रीतसर तक्रार दिली आहे. यामध्ये मंगळवेढा एसटी आगार आणि एसटी प्रशासनाकडून मंदिर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन प्रथमेशच्या पालकांना मिळाले आहे.
सुरक्षेचं प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचं प्रश्न ऐरणीवर आला आहे. अश्याप्रकारे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच एका चिमुकल्या सोबत असं वागणं हे चुकीचे असल्याचे सांगितलं जात आहे.
Ans: पास घरी राहिला होता आणि तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते.
Ans: होय, एका महिला प्रवाशाने पैसे देण्याची तयारी दर्शवली, मात्र कंडक्टरने नकार दिला.
Ans: मंगळवेढा एसटी आगारात लेखी तक्रार दाखल केली.






