US Air strike Syria: अमेरिकेने सीरियामध्ये आयसिसवर केला मोठा हल्ला, हवाई हल्ल्यात डझनभर तळ केले उद्ध्वस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US air strike Syria ISIS 2026 news : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) ने शनिवारी मध्यरात्री सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या (ISIS) अनेक ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ (Operation Hawkeye Strike) अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सीरियातील दहशतवादी नेटवर्कची दाणादाण उडाली आहे. “आमच्या सैन्याला हात लावाल, तर शोधून मारू,” हा संदेश या हल्ल्यातून ट्रम्प प्रशासनाने जगाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने या मोहिमेसाठी दोन डझनहून अधिक प्रगत लढाऊ विमानांचा वापर केला. यामध्ये F-15E Strike Eagles, A-10 Warthog, AC-130J Ghostrider गनशिप्स आणि MQ-9 Reaper ड्रोन्सचा समावेश होता. सीरियाच्या विविध भागांतील ३५ हून अधिक गुप्त तळांना लक्ष्य करून ९० हून अधिक अचूक शस्त्रसामग्री (Precision Munitions) डागण्यात आली. या हल्ल्यात जॉर्डनच्या हवाई दलानेही (F-16 विमानांद्वारे) अमेरिकेला साथ दिली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
हा हल्ला १३ डिसेंबर २०२५ रोजी सीरियातील पालमिरा येथे झालेल्या हल्ल्याचा प्रत्युत्तर मानला जात आहे. त्या हल्ल्यात आयोवा नॅशनल गार्डचे दोन शूर सैनिक—सार्जंट एडगर ब्रायन टोरेस टोवर (२५) आणि सार्जंट विल्यम नॅथॅनियल हॉवर्ड (२९) आणि एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. आयोवा राज्याला ‘हॉकआय स्टेट’ म्हटले जाते, म्हणूनच या मोहिमेला ‘ऑपरेशन हॉकआय’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “हा केवळ हल्ला नाही, तर आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आहे.”
BREAKING: US strikes ISIS in Syria https://t.co/GHdiibk77V #IranRevolution2026 #DigitalBlackoutIran #Syria pic.twitter.com/GeeQFJliGH — Evault Financial Group (@evaultfinancial) January 10, 2026
credit : social media and Twitter
CENTCOM च्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमुळे आयसिसच्या भविष्यातील हल्ले करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हे हल्ले प्रामुख्याने रक्का, देर एज-झोर आणि पालमिरा जवळील जबल अल-अमोर क्षेत्रातील शस्त्रास्त्र भांडार आणि लॉजिस्टिक केंद्रांवर करण्यात आले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, “ही नवीन युद्धाची सुरुवात नाही, तर हा सूड आहे. ज्यांनी अमेरिकेला डिवचले आहे, त्यांना आता त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.”
https://t.co/cfTSJ2Nety — U.S. Central Command (@CENTCOM) January 10, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crew11: अंतराळात आणीबाणी! 25 वर्षांत पहिल्यांदाच NASAने अर्धवट सोडली मोहीम; अंतराळवीरांना तातडीने पृथ्वीवर आणले जाणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून ‘अमेरिका फर्स्ट’ आणि दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. या हवाई हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेतील समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. सीरियातील उर्वरित दहशतवादी गट आता अमेरिकेच्या रडारवर असून, येत्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या अधिक तीव्र कारवाया होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Ans: हे सीरियातील आयसिस विरुद्धचे एक मोठे लष्करी ऑपरेशन आहे, जे पालमिरा येथील अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने सुरू केले आहे.
Ans: अमेरिकेने ९० हून अधिक अचूक क्षेपणास्त्रे, F-15E फायटर जेट्स, A-10 अटॅक प्लॅन्स आणि AC-130J गनशिप्सचा वापर केला आहे.
Ans: आयसिसचे लॉजिस्टिक नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणे आणि अमेरिकन सैन्यावर भविष्यातील हल्ले रोखणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.






