फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉसच्या घरात एका नवीन टास्कला सुरुवात झाली आहे. बिग बॉसने सदस्यांच्या भावनांच्या आधारे यंदाचा नॉमिनेशन टास्क योजिला आहे. प्रत्येकाला त्यांच्या घरातून पत्र आले आहेत पण ‘बिग बॉसच्या घरात ट्विस्ट आहे. हे पत्र त्यालाच वाचायला मिळणार जो नॉमिनेशनपासून स्वतःला सुरक्षित ठेवणार. कौटुंबिक प्रश्न म्हणजे भावनांचा प्रश्न! पत्र वाचण्यासाठी दोघांना मंचावर बोलवण्यात येईल. त्या दोघांना स्वतःला prove करावे लागेल आणि नॉमिनेशनपासून वाचवावे लागेल, जो वाचेल तोच पत्र वाचू शकेल.
अशामध्ये बिग बॉसने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुश्रीने हंबरडा फोडला आहे. अनुश्री आणि संस्कृतीला पत्र वाचण्यासाठी पुढे बोलवण्यात आले पण नियमाप्रमाणे त्यातील एकाला नॉमिनेट करायचे होते आणि नॉमिनेटेड सदस्याला पत्र वाचता येणार नव्हते. तेव्हा संस्कृती वेळ न घालवता अनुश्रीला नॉमिनेट करते आणि अनुश्री एकदाच हंबरडा फोडते.
त्या पात्रात तिच्या आईने तिच्यासाठी काही तरी लिहलं होतं, पण दुर्दैवाने अनुश्री नॉमिनेट झाल्यामुळे तिला ते वाचता आले नाही. त्यामुळे “मला आईचं पात्र पाहिजे” असे जोरात ओरडते आणि रडू लागते. तेव्हा तिला पाहून संस्कृतीही रडू लागते ती म्हणते की “मला एक संधी हवी होती.” संस्कृती गेल्या आठवड्यातच आली आणि लगेच नॉमिनेटपण झाली. तेव्हा प्रेक्षकांनी तिला वाचवले पण तिला या आठवड्यात पुन्हा नॉमिनेट व्हायचे नव्हते म्हणून तिने अनुश्रीला नॉमिनेशनमध्ये ढकलले.
असेच काही प्राजक्ता आणि सागरच्यावेळीही झाले. सागरला त्याच्या मुलीने पत्र लिहले होते. सागर तरीही प्राजक्तासाठी ते पत्र न वाचण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः नॉमिनेट होण्यास तयार झाला. पण प्राजक्ता म्हणाली की ती सागरला अशावेळी नॉमिनेट करू शकणार नाही आणि त्या दोघांनी स्वतः नॉमिनेट होण्याचा निर्णय घेतला. इतर सदस्यांसाठीही हा प्रसंग फार महत्वाचा ठरणार आहे.






