Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! ठरला सुपरहिट

प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले आहे. संपूर्ण टीमसाठी ही मानाची बाब आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 06, 2026 | 11:35 AM
देऊळ बंद २ च्या टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

देऊळ बंद २ च्या टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात देऊळ बंद २ ठरला सुपरहिट 
  • चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केले कौतुक 
  • संपूर्ण टीमच्या कामाबाबात केली प्रशंसा 
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन/दिग्दर्शनातून साकारलेला ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रेक्षकांच्या या अफाट प्रतिसादानंतर आणि चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, ‘देऊळ बंद २’ च्या मुख्य कलाकारांनी आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्टाच्या जनतेने सध्या या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. मुळात या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केल्याची पोचपावती प्रेक्षकही देत आहेत. 

Deool band 2 : ‘देऊळबंद 2’ चा Teaser पाहण्यासाठी व्हा सज्ज! ‘आता परीक्षा देवाची’ 11 वर्षांनंतर सिक्वेलमधला दुसरा सिनेमा

काय म्हणाले मुख्यमंत्री 

मुंबईत पार पडलेल्या या विशेष भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि चित्रपटाच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

 या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते कैलाश वाणी,अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, कॅमेरामन प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भेटी दरम्यान प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’ ला जे भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे ऋणी आहोत. त्यातच आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आमच्या संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित करणारी आहे.” असे उद्गार काढले. 

प्रेक्षकांनी घेतला डोक्यावर

‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने महाराष्ट्रातील छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांमधील मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वत्र प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब या चित्रपटाला गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे राज्यभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटासाठी ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकत असून, दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी भक्कम सुरू आहे.

Deool Band 2: स्वामींची भक्ती अपरंपार, देऊळ बंद २ च्या कलेक्शनमध्ये १० व्या दिवशी मोठी वाढ! रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागं

Web Title: Cm devendra fadnavis praised pravin tarade deool band 2 movie team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
2

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
3

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
4

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.