
Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सोनाली खरेच्या ‘WOW With Sonali’ या शो मध्ये जान्हवी आली होती. तिथे तिने बिग बॉसच्या आठवणी सांगितल्या.ती म्हणाली, मला बिग बॉसमध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती. मला वाटायचं मी तिथे टिकणारच नाही. कारण मी खऱ्या आयुष्यात खूप रडकी आहे. मी खूप इमोशनल आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर मला रडू येतं. जिथे रोज भांडणं होतात तिथे मी कशी राहणार, ही भीती होती. तिला शो ची ऑफर तीन महिने आधीच आली होती.
तेव्हा तिने शोवाल्यांना सांगितलं पण होतं की मी या गेमसाठी नाही आहे. मला भांडता येत नाही. तेव्हा तिची मालिका पण सुरू होती. मालिकेच्या टीमला पण वाटलं की हिला कशाला घेतलं, ही तर भांडणारच नाही. पण नंतर तीन महिन्यात तिने विचार केला की रोजच तेच डेली सोप करायचं की ही आलेली मोठी संधी घ्यायची. मग तिने बिग बॉस मध्ये जायचं ठरवलं.
जान्हवीने हे पण मान्य केलं की घरात गेल्यावर मी स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवायच्या नादात चुकत गेली. मी आहे त्यापेक्षा जास्त आक्रमक होत गेले. मला दाखवायचं होतं की मी पण लढू शकते. पण त्यात मी खरी जान्हवी कुठेतरी हरवले होते.नंतर तिला कळलं की महाराष्ट्राला खोटं नाटक नाही, खरी जान्हवी बघायची आहे. मग तिने स्वतःमध्ये बदल केला. चुका झाल्या पण त्याच घरात त्या सुधारल्या पण. बिग बॉस मधला तिचा प्रवास भारी होता.
सुरुवातीला सगळे तिला ट्रोल करायचे, पण भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने समजावल्यावर ती बदलली. टास्कमध्ये ती एक नंबर होती, म्हणून लोक तिला टास्क क्वीन पण म्हणायचे. शेवटी तर तिने हुशारीने 9 लाखाची बॅग घेऊन शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्याचं तर सगळ्यांनीच कौतुक केलं होतं.या मुलाखतीत तिने तिच्या फिटनेस, प्रेग्नन्सी आणि वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल पण मनमोकळ्या गप्पा मारल्या.