फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या सोशल मीडियावरून दिसेनाशी झाली आहे. तिचे सोशल मीडिया हॅन्डल डिऍक्टिव्हेट झाले की स्वतः जान्हवीकडूनच ते डिलीट झाले? असा प्रश्न तिच्या चाहत्यावर्गाला लागून आहे. परंतु, या संदर्भात स्वतः जान्हवी तसेच तिच्या कुटुंबियांच्या अधिकृत हॅण्डलवरून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती किंवा बातमी देण्यात आली नाही. त्यामुळे जान्हवीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. माध्यमांकडून या संपूर्ण प्रकरणाबाबत जान्हवीच्या अधिकृत प्रतिक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे.
अगदी काहीच दिवसांपूर्वी जान्हवीने तिच्या लेकाचे ईशान किल्लेकरचा वाढदिवस साजरा केला होता. जान्हवीला 10 वर्षांचा मुलगा असून तिचे लग्न किरण किल्लेकरसह झाले आहे. 23 जून रोजी जान्हवीने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवर लेकाच्या वाढदिवसाची पोस्ट शेअर केली होती. यामध्ये जान्हवीसह तिचा पती आणि लेक वाढदिवस साजरा करताना दिसत होते. दिवस सुरु होण्याअगोदर म्हणजेच रात्रीचे ठीक 12 वाजता जान्हवीने लेकाचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर ईशानला भरभरून आशीर्वाद मिळाले होते.
जान्हवीचे चाहते सोशल मीडियावर जान्हवीला नेहमीच डोक्यावर घेतात. जान्हवी निरनिराळे फोटोशूट तसेच पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांची भेट घेत असते. जान्हवी महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रमात हजेरीही लावते, त्या संदर्भात पोस्टही सोशल मीडियावर शेअर करते. परंतु, अचानक या सगळ्या पोस्ट तसेच स्वतः जान्हवी किल्लेकरचे अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल दिसेनासे झाल्याने जान्हवीच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Bigg Boss Marathi Season 5!
जान्हवी किल्लेकर या आधीच्या बिग बॉस मराठी पर्व 5 मध्ये झळकली होती. त्या पर्वात जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखकडून किलर गर्ल असा किताब मिळाला होता. जान्हवी नंतर The 50 या शोमध्येही झळकली होती.
सुरज चव्हाणशी विशेष नाते!
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरज चव्हाणशी विशेष नाते जोडून ठेवले आहे. सुरजच्या लग्नात सुरजच्या बहिणीचे सारे कर्तव्य जान्हवीच्या हस्ते पार पडले. तसेच जान्हवी लवकरच आत्या होणार आहे. सुरज चव्हाणने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून तो लवकरच बाबा होणार आहे.






