Drishyam 3: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नेहा जोशीने या सिनेमात ‘असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस’ नावाच्या पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे. तिने नुकतेच आपले काही बिहाइंड द सीन फोटो शेअर केले आहेत. पोलीस गणवेशात ती एकदम कडक दिसतेय.
फोटो शेअर करत तिने लिहिलंय, “असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टिंग… ‘दृश्यम 3’ मध्ये पुन्हा एकदा या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना शिकण्याचा एक अतिशय सुंदर अनुभव मिळाला!”तिची ही पोस्ट पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
‘दृश्यम’ सारख्या मोठ्या सिनेमात काम करणं ही काही छोटी गोष्ट नाही. या सिनेमात अजय देवगण, तब्बू, प्रकाश राज, जयदीप अहलावत सारखे मोठे कलाकार आहेत. नेहाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तिने सांगितलं की या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. नेहा जोशीला मराठी प्रेक्षक चांगलंच ओळखतात. तिने अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा अभिनय नेहमीच नैसर्गिक असतो.
View this post on Instagram
जर तुम्ही ‘दृश्यम 2’ पाहिला असेल तर तुम्हाला नेहा आठवत असेल. त्या सिनेमात ती विजय साळगावकर म्हणजे अजय देवगणच्या घराच्या शेजारी राहायला येते. ती आणि आणखी एक पोलीस ऑफिसर सामान्य माणसासारखे राहतात पण खरं तर ते पोलीस असतात. ते विजयच्या कुटुंबावर लक्ष ठेवत असतात, त्यांचं बोलणं रेकॉर्ड करतात. तिचा रोल छोटा होता पण खूप महत्वाचा होता.
Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय
आता ‘दृश्यम 3’ मध्ये पण त्याच भूमिकेचा पुढचा भाग दाखवला आहे. यावेळी तिचा रोल कॅमिओसारखा आहे, म्हणजे थोड्या वेळासाठीच ती दिसते, पण ती दिसली तरी प्रेक्षक तिला लगेच ओळखतात.
नेहाने फोटो टाकल्यानंतर तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मराठी अभिनेत्री अनिता दातेने पण तिला कमेंट करून अभिनंदन केलं आहे.
Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स …
एका चाहत्याने लिहिलंय, “जेव्हा प्रकाश राज तुम्हाला चंगू मंगू म्हणतात तेव्हा अख्खं थिएटर हसतं”. तर दुसऱ्याने लिहिलंय, “रोल छोटा होता पण नक्कीच तुला खूप शिकायला मिळालं असेल”. अनेकांनी “मस्त काम केलंस नेहा” असं म्हणत तिचं कौतुक केलंय.खरं तर छोटा रोल असला तरी मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम करणं हे प्रत्येक कलाकारासाठी मोठं असतं. नेहा जोशीने पण या संधीचं सोनं केलं आहे.’दृश्यम 3′ अजूनही थिएटरमध्ये चालू आहे.






