Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग

Bhau Kadam: लोकप्रिय विनोदी अभिनेते भाऊ कदम ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नव्या मराठी नाटकातून पुन्हा रंगभूमीवर झळकणार आहेत. प्रेम, लग्न आणि नात्यांमधील गमतीदार प्रसंगांवर आधारित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 04:30 PM
Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

आपल्या विनोदी अभिनयाने नेहमीच खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम आता रंगभूमीवरही हास्याची मेजवानी घेऊन येत आहेत. नात्यांमधली गंमत, प्रेम आणि लग्नाभोवती फिरणाऱ्या भन्नाट प्रसंगांचा मनोरंजक अनुभव देण्यासाठी ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक सज्ज झाले आहे. या नव्या नाटकात अभिनेते भाऊ कदम एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भाऊ कदम यांच्या विनोदी अभिनयाची खास शैली आणि नात्यांमधील गमतीदार प्रसंगांची सांगड या नाटकातून रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका

स्वप्नील बारसकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी केली आहे. मैथिली वारंग, सुजाता किरण, पुनम सरोदे परब, साकार देसाई आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात पाहायला मिळणार आहेत. तसेच या नाटकाला साई पियुष यांनी संगीत दिले आहे. हे नाटक नातेसंबंध, प्रेम आणि लग्न यांची विनोदी अंगाने मांडणी करत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. Bhau Kadam:

प्रेक्षकांसमोर काम करण्याचा अनुभव

नाटकाबद्दल अभिनेते भाऊ कदम म्हणतात, “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नाटकाची कथा, संकल्पना खूपच गमतीदार आहेत. तसेच त्यातील प्रसंग प्रेक्षकांना हसवणारे आहेत. माझ्यासोबतची संपूर्ण कलाकारांची टीम उत्तम आहे. रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर काम करण्याचा अनुभव नेहमीच खास असतो आणि या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी मी खूप उत्सुक आहे.”

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

दिग्दर्शक संतोष पवार म्हणतात, “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक करताना विनोदासोबतच नात्यांमधील भावनाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची कथा, कलाकारांची केमिस्ट्री आणि प्रसंगांची मांडणी यामुळे रंगमंचावर एकामागोमाग एक धमाल प्रसंग पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी नाटकाचा आनंद मनापासून घ्यावा, हीच आमची इच्छा आहे. पुण्यातील शुभारंभाच्या प्रयोगासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.”

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

नाटक प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल

निर्माते डॉ. उमेश आजगांवकर म्हणतात, “प्रेक्षकांना रंगमंचावर एक दर्जेदार आणि मनोरंजक नाटक अनुभवता यावे, या उद्देशाने ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नाटकाची निर्मिती केली आहे. उत्तम कलाकारांची टीम, स्वप्नील बारसकर यांचे लेखन आणि संतोष पवार यांचे दिग्दर्शन यामुळे हे नाटक आकाराला आले आहे. हे नाटक प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल याची आम्हाला खात्री आहे.”

Web Title: Bhau kadam returns to theatre with pahili lagnachi dusri premachi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • navarahstra news

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.