( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘अभिजात मराठी फिल्मी’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाल्या, आग या चित्रपटाच्या शूटिंग वेळी शिल्पा शेट्टी आणि मी फावल्या वेळात कादर खान यांच्याकडून उर्दू शिकायचो. शिल्पाचा स्वभाव खूप गोड आहे. तिला मराठी समजतं आणि बोलायलाही आवडतं.”
याच सोबतच प्राजक्ता यांनी मराठी आणि हिंदी अभिनेत्रींसोबत आलेला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “खरं सांगायचं तर, इंडस्ट्रीत काम करताना मला काही मराठी अभिनेत्रींकडून वाईट अनुभव आले. काही कलाकार असे आहेत, ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून काम केलं आहे. पण समोर आल्यावर ते ओळखही दाखवत नाहीत. मी ओळखतच नाही अशा झोनमध्ये ते असतात. पण, शिल्पाने असं केलं नाही.” त्यांचा हिंदी अभिनेत्रींबरोबरचा अनुभव खूप चांगला राहिला असही त्यांनी सांगितले.
पुढे प्राजक्ता म्हणाल्या, प्राजक्ता म्हणाल्या, “मध्यंतरी एका शूटिंगदरम्यान शिल्पा व्हॅनिटीमध्ये होती आणि मी मेकअप रूममध्ये होते. मला समजलं की तिचं शूटिंग सुरू आहे, म्हणून मी तिला भेटायला गेले. अनेक वर्षांनी आमची भेट झाली होती. मला पाहताच तिने मला मिठी मारली. आमची भेट खूप छान झाली.”
शिल्पा शेट्टीच्या स्वभावाबद्दल बोलताना त्यांनी पुढे सांगितलं, “आजही ती भेटली तरी तेवढ्याच आपुलकीने ओळख दाखवेल, याची मला खात्री आहे. तिच्यात जराही अॅटिट्यूड नाही. ती प्रत्येकाशी अगदी मनापासून वागते.”
याच मुलाखतीत प्राजक्ता कुलकर्णी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवांची तुलना करताना सांगितलं की, काही मराठी कलाकार समोर आल्यावरही ओळख दाखवत नाहीत. मात्र, हिंदी कलाकारांकडून त्यांना कायमच चांगला अनुभव आला.






