Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पांडुरंगाचे बोलवणं आले अन्…’ अभिनेत्री अक्षया नाईकने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव, भावना व्यक्त करत म्हणाली…

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पंढरीच्या वारीचा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येक मराठी मनामध्ये असते. यंदाच्या आषाढी वारीत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया नाईक हिची हीच इच्छा माऊलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 22, 2026 | 03:24 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री अक्षया नाईकने सांगितला अनुभव
  • हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली
  • पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि…
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक असलेली पंढरीची वारी. या वारीचा भाग होता येणं हे आपल्या नशिबातली सगळ्यात सुंदर गोष्ट असं मानलं जातं. दरवर्षी हजारो वारकरी वारीचा भाग बनतात आणि विठूरायाला भेटायला जातात. या वारीचं वेड काही कलाकारांनाही चुकलेलं नाही. बऱ्याच कलाकारांनी या वारीचा हिस्सा बनत ती जगली. असाच अनुभव अभिनेत्री अक्षया नाईक हिने घेतला.

Man Mandira – Gajar Bhakticha : आता घरोघरी विठ्ठल! आषाढी एकादशी निमित्ताने प्रत्येक घरी रंगणार गजर कीर्तनाचा कार्यक्रम

हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली

वारीत अविरत चालणारी मंडळी आणि विठ्ठल माऊलीचे सेवाकरी आणि त्यांचा सोबतीने कधीतरी आपण सुद्धा वारी करावी अस मनात असलेली एक इच्छा आणि यंदाच्या वारीत अभिनेत्री अक्षया नाईकची हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. अक्षया ने तिच्या पहिल्या वहिल्या वारीचा अनुभव शेयर केला.

पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि…

वारीबद्दल बोलताना ती भरभरुन बोलली. अक्षयाने तिच्या पहिल्या वारीचा अनुभव शेअर करताना सांगितलं, “ वारी बद्दल कायम मनात एक उत्सुकता होती कधीतरी आपण सुद्धा असंच बाकी वारकरी मंडळीसोबत वारी अनुभवू शकू का? हा प्रश्न कायम मनात होता आणि यंदा अचानक का होईना पण पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली वारी अनुभवली”, असं म्हणत तिने विठ्ठलाकडून आलेल्या बोलवण्याचा आवर्जुन उल्लेख केला.

वारी अनुभवावी लागते

वारकऱ्यांच्या उत्साहाबाबत तिने विशेष सांगताना म्हणाली की,” वारीत चालणारी मंडळी बघून त्यांचा मध्ये एवढी ऊर्जा कशी येत असावी हे वारीत जाऊन अनुभवता आल. हा समृद्ध संपन्न अनुभव शब्दांत मांडूच शकत नाही कारण अस म्हणतात वारी ही अनुभवावी लागते आणि हा प्रत्यय वारी करून आला. टाळ मृदुगांचा गजर, हरिनामाचा जप आणि वारी मधला उत्साह हा शब्दाच्या पलीकडचा आहे. वारीत जाऊन मला विठ्ठल रुखमिणी रूपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी देखील मिळाली आणि माझी वारी सुफळ संपूर्ण झाली” अशा शब्दांत तिने आपला वारीचा अनुभव सांगितला आहे.

म्हणून एकदा तरी करावी वारी

आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राच्या लोकजीवनाची, संतपरंपरेची आणि भारतीय संस्कृतीतील भक्ती आंदोलनाची जिवंत ओळख आहे. सुमारे हजार वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही त्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने पुढे चालू आहे. आजही ती तितक्या आदराने आणि प्रेमाने जपली जात आहे. ही संस्कृती जगण्यासाठी हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा तरी वारी अनुभवावी असं बरेच जण सांगतात. पण हे असं का सांगतात ते वारीत गेल्याशिवाय कळायचं नाही.

आजीच्या स्वरांचा वारसा नातीने जपला! प्रियांका बर्वे घेऊन आली विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना ‘विठ्ठलाचे भेटी’

Web Title: Marathi actress akshaya naik shares her first pandharpur wari experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari 2026
  • Entertainement News
  • Entertainment News
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.