(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘ब्लूफ्लाय’ची घोषणा प्रियंका चोप्राच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘रिसेट’ (Reset) नंतर करण्यात आली आहे. या सर्व्हायव्हल थ्रिलरमध्ये ती ऑर्लॅंडो ब्लूमसोबत दिसणार आहे. याआधी तिचा ‘द ब्लफ’ (The Bluff) हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला होता आणि त्याने जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावले. तसेच इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत ती ‘Heads of State’ मध्येही झळकली होती.
प्रियंका चोप्रा लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
काँगोच्या दाट जंगलात घडणाऱ्या या कथेत, संयुक्त राष्ट्रसंघाचा दुःखाने ग्रासलेला एक अनुवादक एका गुप्त ब्लॅक-ऑप्स मोहिमेचा भाग बनतो. अस्तित्वात नसावे असे मानले जाणारे एक कोसळलेले विमान शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. मात्र, मोहिम पुढे सरकत असताना हे स्पष्ट होत जाते की, त्या विमानाला परत आणण्यासाठी नव्हे तर एका भयावह सत्याला सामोरे जाण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे. विज्ञानकथा आणि थरार यांचा संगम असलेला ‘ब्लूफ्लाय’ हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती Polite Society, Broken Open Pictures, G2 Dispatch आणि Highland Film Group यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. Highland Film Group जगभरातील वितरणाची जबाबदारी सांभाळणार असून, चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण यावर्षीच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू होणार आहे.
प्रियंका चोप्रा जोनस भारतीय चित्रपटसृष्टीबरोबरच हॉलिवूडमध्येही सातत्याने दमदार भूमिका साकारत आहे. त्यामुळे ‘ब्लूफ्लाय’मध्ये तिची आणि रसेल क्रो यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत






