मुंबई : निसान इंडियाने (Nissan India) त्यांच्या निसान मॅग्नाइट कन्सेप्ट (Nissan Magnet Concept) या नव्या कोऱ्या बी-एसयुव्हीच्या संरचनेमागील दृष्टिकोन उलगडून सांगतानाच गाडीचा अंतर्गत भाग, तसेच बाह्यभागाच्या रचनेतील नवीन पैलूही जाहीर केले. निसान कुटुंबातील ही नवी गाडी निसानच्या जागतिक एसयुव्ही (suv) वारशाला भविष्याती प्रवासासाठी सज्ज करणारी असून भारतासाठी आणि निर्यात करण्यात येणाऱ्या देशांसाठी तिची रचना करण्यात आली आहे.
निसान मॅग्नाइट कन्सेप्टचा अंतर्गत भाग हा आडव्या समांतर इन्स्ट्रुमेंट पॅनेलमुळे रुंद आणि ऐसपैस असून वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि क्लिफ सेक्शन असलेल्या एअर व्हेंटिलेटर्सचा यात समावेश आहे. त्यामुळे गाडीला स्पोर्टी लुक मिळून तिच्या एसयूव्ही फीलमध्ये भर पडली आहे. अधिक आरामदायी अशा मोनो-फॉर्म आकाराच्या स्पोर्टी सीट्स असून मागील बाजूच्या सीट्समध्ये दमदार पॅटर्न आणि गुबगुबितपणा असल्यामुळे गाडीच्या प्रीमिअमपणात वाढ झाली आहे.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, “निसान मॅग्नाइट कन्सेप्टची रचना जपानमध्ये केली असली तरी भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन ती करण्यात आली आहे. गाडीचा पुढील भाग आणि ग्रिल फ्रेममध्ये असलेल्या व्हर्टिकल मोशनमुळे गाडीला एक प्रकारचा भक्कमपणा आला आहे. याउट अत्यंत स्लीक आणि शार्प अशा एलईडी हेड लँप्स आणि एल शेप डेटाइम रनिंग लाइटमुळे गाडीचा प्रभावी ठसा निर्माण होतो. या विलक्षण मिश्रणामुळे गाडीला विश्वासपूर्ण आणि धाडसी लुक मिळाला असून विशेष टिंटेड लाल रंगामुळे गाडीची प्रतिमा अधिक ठाशीव आणि वेगवान झाली आहे.”
एकंदरीत धाडसी संरचना आणि रंगामुळे निसान मॅग्नाइट कन्सेप्ट ही लक्षवेधक ठरेल आणि भारतातील रस्त्यांवर असलेल्या गाड्यांच्या भाऊगर्दीत निश्चितपणे वेगळी उठून दिसेल. निसानच्या एसयूव्ही इतिहासात निसान मॅग्नाइट कन्सेप्ट ही पुढील टप्प्यावर घेऊन जाणारी गाडी असून भारतीय बाजारपेठेसाठी तिची रचना करण्यात आली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.






