अजित पवारांना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार
सचिन खरात यांनी सोडली अजित पवारांची साथ
ऐन प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का
Maharashtra Politics: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सर्वत्र निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात सर्व पक्ष आपल्या विजयासाठी प्रचार करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठा जोर लावताना दिसून येत आहेत. दरम्यान निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने त्यांची साथ सोडल्याचे समोर येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान अजित पवारांची साथ एका बड्या नेत्याने साथ सोडली आहे. अजित पवारांनी आरपीआय (खरात गट)शी युती केली होती.
हे देखील वाचा : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी
आरपीआय (खरात) गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. त्यांची अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल असे जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. सचिन खरात यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अजित पवारांसामोर प्रश्न उभा राहिला आहे.
काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का?
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. मुंबईसह 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वी मागील हेवेदावे विसरुन युती होत असल्यामुळे पुढील काळामध्ये नवीन समीकरणे दिसून येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. मात्र ही युती पुढे कायम राहणार का याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी शरद पवारांसोबत केलेल्या युतीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार हे पुन्हा एकदा पूर्ण राष्ट्रवादीमध्ये दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी दिलेले उत्तर हे चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार म्हणाले की, . मी या विषयावर आताच भाष्य करणार नाही. राज्याचे बजेट आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पार पडू द्या, मगच मी यावर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.






