सरफराज खान(फोटो-सोशल मीडिया)
Sarfaraz Khan has made history ! विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने इतिहास रचला आहे.पंजाबसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना सर्फराजने फक्त १५ चेंडूचा सामना करत अर्धशतक झळकावले आहे, लिस्ट ए क्रिकेट इतिहासात त्याच्या आधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही.भारताने १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध पहिला लिस्ट ए सामना खेळला. हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. ५१ वर्षांत कोणत्याही भारतीय फलंदाजाने हा पराक्रम करता आलेला नाही.
जयपूरमधील जयपुरिया विद्यालय मैदानावर २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, मुंबईने शानदार सुरुवात केली. मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशी यांनी ८.२ षटकांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. त्याचा भाऊ मुशीर माघारी परतल्यावर, एका षटकात तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. त्यानंतर त्याने डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रारला फटकावून पाच चेंडूत १९ धावा चोपल्या. सरफराज खान अखेर २० चेंडूत ६२ धावांवर मयंक मार्कंडेने त्याला एलबीडब्ल्यू केले. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. उपलब्ध माहितीनुसार, लिस्ट ए क्रिकेटमधील हे चौथे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक श्रीलंकेच्या कौशल्या वीररत्नेने झळकवले होते. त्याने २००५-०६ च्या हंगामात एका घरगुती सामन्यात फक्त १२ चेंडूत अर्धशतक लगावले होते.
सरफराजने महाराष्ट्राच्या अभिजित काळे आणि बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू अतित शेठ यांचे विक्रम मोडीत काढले आहे. काळेने १९९५ मध्ये बडोद्याविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते, तर शेठने २०२१ मध्ये छत्तीसगडविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला केला होता. तथापि, सरफराजच्या या ऐतिहासिक खेळीनंतरही मुंबईने सामना गमावला.
सरफराज खान सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने सहा डावांमध्ये ७५.७५ च्या सरासरीने आणि १९०.५६ च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा फटकावल्या आहेत. त्याने ३१ डिसेंबर रोजी गोवाविरुद्ध १५७ धावा केल्या आणि त्यापूर्वी उत्तराखंडविरुद्धही अर्धशतक लगावले होते. मुंबईने या स्पर्धेच्या बाद फेरीसाठी आधीच पात्रता निश्चित केली आहे.
हेही वाचा : रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO
मुंबईच्या सामन्याबद्दल बोलायच झालं तर, १८ व्या षटकात १६९/३ वर मजबूत स्थितीत असून देखील, सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि कर्णधार श्रेयस अय्यर बाद माघारी गेले. यामुळे संघ अचानक कोसळला. चार विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी १६ धावांची गरज असताना, मुंबईला हा सामना एका धावेने गमवावा लागला.






