गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आणि शिवसेना (Shivsena) उतरणार असल्याने रंगत वाढली आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमधील लढत यामुळे रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र तृणमूल काँग्रेस आणि आपमुळे बिगरभाजपा पक्षांना नुकसान होत भाजपालाच फायदा होईल, असा दावा काँग्रेस नेते करत आहेत. यावरुन आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी टोला लगावला आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आशास्थान आहे, गोव्यातील लोकांचा नाही असा टोला अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला लगावला आहे.
मेरा आकलन है कि आम आदमी पार्टी (और तृणमूल कांग्रेस) गोवा में गैर-भाजपा वोट को केवल खंडित करेगा, श्री अरविंद केजरीवाल द्वारा पुष्टि की गई है।
गोवा में मुकाबला कांग्रेस और भाजपा के बीच है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 17, 2022
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गोव्यातील जनतेला आवाहन करताना योग्य शासनाची निवड करत काँग्रेसला मदत देण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा आधार घेत म्हटलं होतं की, “गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष बिगरभाजपा मतांना खंडित करेल असा माझा अंदाज आहे. केजरीवालांनीही हे मंजूर केलं आहे. गोव्यात सामना काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे”.
सर, रोना बंद कीजिए- “हाय रे, मर गए रे, हमारे वोट काट दिए रे”
Goans will vote where they see hope
Cong is hope for BJP, not Goans.15 of ur 17 MLAs switched to BJP
Cong guarantee- every vote to Cong will be safely delivered to BJP. To vote BJP, route thro Cong for safe delivery https://t.co/tJ0cswgi74
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 17, 2022
केजरीवाल यांनी निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला नाही तर त्यांचा पक्ष गोव्यातील आघाडी सरकारचा भाग होण्यास तयार आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यानी उत्तर दिलं आहे.
[read_also content=”उत्तर प्रदेश निवडणूक, मायावतींच्या बसपाच्या उमेदवारांचा भाजपाला होणार फायदा https://www.navarashtra.com/india/uttar-pradesh-elections-mayawatis-bsp-candidates-will-benefit-bjp-nraa-223765/”]
केजरीवाल म्हणाले की, “रडगाणं बंद करा सर…जिथे आशा आहेत त्यांना जनता मत देईल. काँग्रेस भाजपासाठी आश्वास्थान आहे, गोव्यातील जनतेसाठी नाही. तुमच्या १७ पैकी १५ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचं प्रत्येक मत भाजपाला जाईल याची खात्री बाळगत आहे. भाजपाला मत देण्यासाठी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला जात आहे”.
गोव्याच्या एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.