फोटो सौजन्य - Social Media
आजच्या जगामध्ये प्रत्येकाला स्टायलिश दिसायचं आहे. प्रत्येक जण नवा ट्रेंडचे अनुसरण करण्यात गुंतले आहेत. बहुतेक जण आपण किती मॉडर्न आहोत, हे जगाला दाखवण्यास कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीत. अशामध्ये इअरफोनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. बहुतेक लोकं तासन तास वायरलेस इअरफोन कानाला लावून ठेवतात. त्यावर मोठ्या आवाजामध्ये गाणे वा इतर गोष्टी ऐकत असतात. परंतु, या गोष्टींचा पुढे जाऊन कानाला त्रास होतो. एकंदरीत, व्यक्तीला स्टाईल जपणे अंगाशी येते. अशीच एखादी घटना एका महिलेसोबत घडली आहे.
हे देखील वाचा : फक्त छाती नव्हे, शरीराच्या ‘या’ भागाच्या दुखण्यानेही सावध व्हा; असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत
तुर्की या देशातील स्थायिक असलेल्या एका महिलेसोबत दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये या महिलेने ऐकण्याची क्षमता हरवली आहे. कानामध्ये इअरफोन फुटल्याने महिला बहिरी झाली आहे. आयुष्यभरासाठी तिने तिच्या ऐकण्याच्या क्षमतेला गमावले आहे. मुळात, या घटनेने सर्वांना सावध केले आहे. याबाबत WHO ने त्यांचे मत मांडले आहे. तसेच लोकांना या बाबत जागृत केले आहे. WHO चे म्हणणे आहे कि,” इअरफोनचा वापर लाखो लोकांच्या खासकरून युवकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहे. इअरफोनच्या जास्त वापराने कानामध्ये इन्फेक्शन होणे, कानात वेदना होणे, डोकेदुखी तसेच झोप न येण्यासारखे समस्या उदभवतात.”
आजच्या काळामध्ये लोकं खाताना, रस्त्यावरून चालताना, काम करताना अगदी व्यायाम करताना देखील कानामध्ये इअरफोन घालून असतात. याचा परिणाम कानाच्या पडद्यावर गंभीर स्वरूपात होतो. कालांतराने आपली ऐकण्याची क्षमता कमी होत जाते. शेवटी, इअरफोनचा अतिवापर आपल्या कानांना इतका प्रभावित करतो कि आपले पडदे पूर्णपणे डॅमेज होऊन जातात. जगामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये इअरफोनच्या अतिवापरामुळे अनेक युवकांनी आपल्या कानांच्या पडद्याला नुकसान करून घेतले आहे.
हे देखील वाचा : निराशा आहे की डिप्रेशन? जाणून घ्या मानसिक आरोग्याची लक्षणे
इअरफोनचा वापर करणे चुकीचे नाही आहे, परंतु अतिवापर करणे फार चुकीचे आहे. इअरफोनवरून गाणे किंवा काहीही ऐकताना आवाजाची पातळी कमी ठेवावी, जेणेकरून कानांना त्रास होणार नाही. कानांना स्वच्छ ठेवा तसेच त्यांचा रेगुलर चेकअप करत राहा.