फोटो सौजन्य : गुगल
झोपेत अनेकांना घोरण्याची सवय असते. सर्वसामान्य असं म्हटलं जातं की झोपेत एखादी व्यक्ती घोरते म्हणजे गाढ झोप लागलेली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते घोरण्याचा आणि गाढ झोपण्याचा काहीही संबंध नाही. याउलट घोरणं म्हणजे एक शारीरिक व्याधी आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्ही झोपेत घोरता का ? जर उत्तर हो असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. सतत घोरण्याच्या समस्येवर नेमका उपाय काय हे जाणून घेऊयात.
घोरणे म्हणजे काय ?
झोपल्यावर गळ्यातील आणि तोंडातील स्नायू सैल होतात. श्वास घेताना कंपनं तयार होतात आणि आवाज येतो यालाच घोरणं म्हणतात. झोपेत श्वास घेण्यास अडथळा होणं किंवा श्वासांची गती वाढल्याने घोरणं सुरु होतं. यामागे अनेक कारणं आहेत.
तुम्ही सतत शारीरिक कष्टाची कामं करत असाल तर रात्री झोपेत घोरण्याची समस्या होते.
तुम्हाला पाठीवर झोपण्याची सवय असल्यास देखील झोपेत घोरणं जास्त वाढतं.
जर तुम्ही खूप जास्त स्मोकींग करत असाल किंवा झोपण्यापूर्वी स्मोक करत असल्यास देखील झोपेत घोरणं जास्त वाढतं. ट
शरीराच्या योग्यतेपेक्षाही जास्त वजन वाढत असल्यास घोरण्याची समस्या वाढते.
सतत घोरणं केवळ एक सवय नसून, झोपेचा आणि आरोग्याचा प्रश्न ठरू शकतो. काही वेळा हे स्लीप अॅप्निया (Sleep Apnea) सारख्या गंभीर झोपेच्या विकाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हालाही सतत हा त्रास होत असल्यास सर्वात प्रथम वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
वजन कमी करा:
शरीरातील अतिरिक्त मेद, विशेषतः मान आणि गळ्याभोवती, श्वासमार्गावर दाब टाकतो आणि घोरणं वाढतं.
पाठीवर झोपणे टाळा:
पाठीवर झोपल्यावर जीभ आणि घशातील ऊती श्वासमार्ग अडवतात. त्यामुळे करवट घेऊन झोपणं उपयुक्त ठरतं.
नाक स्वच्छ ठेवा:
सर्दी, अॅलर्जीमुळे नाक बंद असल्यास घोरणं वाढतं. स्टीम घेणं, नाकासाठी सलाइन स्प्रे वापरणं फायदेशीर ठरतं.
मद्यपान आणि धूम्रपान टाळा:
हे दोन्ही श्वसनमार्ग अधिक सैल करतात, ज्यामुळे घोरणं वाढतं.
झोपेची नियमित वेळ ठेवणं:
पुरेशी आणि नियमित झोप घेतल्याने शरीराचा थकवा कमी होतो आणि झोपेत स्नायू सैल होत नाहीत.श्वसनाला अडथळा निर्माण झाल्यास घोरण्याची समस्या वाढते. कफ असल्यावर देखील श्वासनाला अडथळा निर्माण होतो. त्य़ामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याची वाफ घ्यावी.यामुळे नाक, घसा आणि छाती मोकळी होते. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावं यामुळे घसा मोकळा होण्यास मदत होते.