फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीत शेवग्याच्या शेंगाना एक विशेष दर्जा आहे. राज्यात विविध डाळीत तसेच आमटीमध्ये शेवग्याच्या शेंगाना त्या आमटीचा स्वाद वाढवण्यासाठी आवर्जून टाकले जाते. त्यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या झाडाला येतात यात काही नवल नाही. पण हे झाड मात्र खूप नवल आहे. कारण, या झाडाला येणारा प्रत्येक घटक हा पोषकतत्वांनी भरपूर आहे. या झाडावरील पान, फुल, फळं, शेंगा सगळ्यांमध्ये पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे फक्त महाराष्ट्र नाही तर भारतात अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या जातात. कारण शेवग्याच्या शेंगा फक्त स्वादिष्ट नसून तितक्याच आरोग्याला पोषक असतात. परंतु, यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका निभावतात ते म्हणजे शेवगाच्या झाडाला येणारी पाने!
हे देखील वाचा : चेहऱ्यावरील चट्ट्यापासून त्रासले आहात? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर
शेवग्याच्या झाडाला येणारी पाने पोषकतत्वांनी भरपूर असतात. व्हिटॅमिन ए, सी तसेच ई ने भरपूर असलेले शेवग्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, पोटेशियम तसेच आयरन असते. शेवग्याच्या भाजीचे नियमित सेवन केल्याने आपले शरीर अनेक आजरांशी लढण्यासाठी तयार होते. शेवग्याच्या पानांपासून बनलेल्या भाजीपासून फॅटी लिव्हरचा त्रास होत नाही. या भाजीचे सेवन केल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर टाळता येते. यामध्ये असलेले पोषक तत्व यकृताची जळजळ कमी करतात आणि त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. त्याचबरोबर ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी शेवग्याची भाजी आवर्जून खावी. या भाजीत सापडणारे अँटिऑक्सिडंट क्वेर्सेटिन ब्लड प्रेशरचा त्रास कमी करण्यास मदत करतात. या भाजीत असणारे पोटेशियम रक्तभिसरणाला चालना देतात.
डायबिटीजचा त्रास असलेल्या रुग्णांनी शेवग्याची भाजी खाल्लीच पाहिजे. शेवग्याच्या पानामध्ये सापडणारे इन्सुलिन शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या भाजीच्या सेवनाने भविष्यात डायबिटीज होण्याची शक्यताही दूर होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या लोकांसाठी शेवग्याची भाजी खाणे फायद्याचे ठरू शकते. यातील फायबर आणि अँटिऑक्सिडंट LDL लेव्हलला कमी करण्यास उपयुक्त ठरते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या किंवा पोट वाढीच्या समस्येला कंटाळलेल्या लोकांनी या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनाने भूक कमी होतेच त्याचबरोबर या भाजीतील क्लोरोफिल हा घटक वजन कमी करण्यास फायद्याचे ठरते.