फोटो सौजन्य: iStock
तरुण तरुणी हळूहळू वयात येऊ लागले की त्यांना प्रेमाचे डोहाळे लागत असतात. काही जण प्रेमाला व्यक्त करतात तर काही ते प्रेम मनाच्या कोपऱ्यातच कैद करून ठेवतात. पूर्वीच्या प्रेमात आणि आताच्या प्रेमात खूप मोठा फरक आढळून येतो. पूर्वी दोन प्रेमींना जोडपं बोलले जायचे पण आज हाच शब्द कपल म्हणून प्रचलित झाला आहे.
ब्रेकअप, हुकअप आणि रिलेशनशिप हे काही शब्द हल्लीच्या प्रेमाच्या दुनियेत वारंवार ऐकायला मिळतात. पण आता एक नवीन शब्द सध्या रिलेशनशिपमध्ये वापरताना दिसत आहे. हा शब्द म्हणजे ‘ऑर्बिटिंग’. सध्या अनेक पार्टनर ब्रेक अप झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या पार्टनरसोबत ऑरबिटिंग करताना दिसतात.
प्रत्येकजण रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होण्याचे दुःख सहजासहजी सहन करू शकत नाही. या घटनेमधून बाहेर येताना आपल्याला वारंवार जोडीदाराची आठवण येत असते. त्यातही ती किंवा तो व्यक्ती ऑर्बिटिंग करत असेल तर मग त्यांना विसरणे कठीण होऊन बसते. चला जाणून घेऊया, प्रेम आणि ब्रेकअपच्या या युगात ऑर्बिटिंग करणे म्हणजे काय.
लैंगिक संबंधानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये तुम्हालाही होतेय का UTI ची समस्या, काय आहेत कारणं
ऑर्बिटिंगचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत ब्रेकअप करतो व तुमच्या सोबत डायरेक्ट संबंध तोडतो, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती किंवा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात ‘व्हर्च्युअल प्रेजेंट’ असतो. तुमचा एक्स पार्टनर तुमची पोस्ट लाइक करतो, तुमच्या स्टोरीज पाहतो, पण तुमच्या मेसेजेसना रिप्लाय देत नाही किंवा थेट संभाषण सुरू करत नाही. या वागण्याने असे वाटते की तो किंवा ती व्यक्ती तुमच्या ‘ऑर्बिट’ मध्ये आहे, तुमच्याभोवती फिरत आहे, परंतु शारीरिकदृष्ट्या कधीही जवळ येत नाही. यालाच ऑर्बिटिंग असे म्हणतात.
ब्रेकअपनंतर काही लोक त्यांच्या जोडीदारापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाहीत. सोशल मीडियाद्वारे कनेक्ट राहिल्याने त्यांना असे वाटते की ते अजूनही तुमच्या जीवनाचा एक भाग आहेत, जरी ते एकतर्फी अटेचमेंट असले तरीही.
ब्रेकअपनंतर तुम्ही काय करत आहात हे एक्स पार्टनरला बघायचे आहे. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही दुसऱ्या कुणासोबत आहात का? हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना तुमच्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह ठेवते. एक प्रकारे ते तुमचा ऑनलाइन पाठलाग करत आहेत.
कधीकधी ब्रेकअप योग्य प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीत जोडीदार ‘क्लोजर’ शोधतो. ऑर्बिटिंग हा या अपूर्ण समस्येचा तात्पुरता उपाय बनतो.
सोशल मीडियामुळे लोकांमध्ये ‘FOMO’ म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ची भावना वाढली आहे. तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेणे त्यांना थांबवायचे नाही आहे.