कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, बॅरी पोलॅक हे जगातील सर्वात दिग्गज आणि प्रसिद्ध वकिल आहेत. त्यांनी विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना अमेरिकेच्या ताब्यातून मुक्त केले होते. यामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता. आता ते न्यूयॉर्क न्यायालयात मादुरोकडून खटला लढवणार आहेत. मादुरोविरुद्ध नार्को-दहशतवाद आणि कोकेन तस्करीच्या आरोपांवर युक्तिवाद सादर करणार असूवन हा खटला एक भू-राजकीय संघर्ष ठरणार आहे.
बॅरी पोलॅक हे अमेरिकेतली सर्वात प्रभावशाली आणि अनुभवी ट्रायल लॉयर म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंधित अनेक उच्चस्तरिय प्रकरणे हाताळली आहे. त्यांनी हेरगिरीच्या कायद्याअंतर्गत विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा खटला लढवला होता. या प्रकरणामध्ये त्यांच्या विजयाने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. ते अमेरिकन प्रशासनाच्या धोरणांना देखील थेट आव्हान देण्याची प्रतिमा ठेवतात.
पोलॅक यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर ही विकिलिक्सच्या संस्थापक ज्युलियन असांज यांच्या प्रकरणामुळे आहे. असांज यांच्यावर अमेरिकेने हेगरिगीच्या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली होती. परंतु पोलॅक यांनी डावपेच खेळत अमेरिकन सरकारला तडजोड करण्यास भाग पाडले होते. ज्यामुळे असांज यांची सुटका झाली आणि बॅरी जे. पोलॅक यांचे जागतिक स्तरावर नाव झाले.
मादुरो यांच्या प्रकरणामध्ये पोलॅक यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ते अमेरिकन कोर्टात सॉवरेन इम्युनिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, राष्ट्रप्रमुखांना संरक्षण मिळते हा मुद्दा न्यायालयात मांडू शकतात. तसेच ते अमेरिकेची कारवाई ही राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा मुद्दाही प्रभावीपणे मांडतील. अमेरिकेच्या वैध पुराव्यांनाही पोलॅक आव्हान करु शकतात.
मादुरोवर कोकेनची तस्करी आणि नेटवर्कचे संरक्षण करण्याचा, तस्करांना राजनैतिक पाठिंबा प्रदान करण्याचा, सत्तेचा २५ वर्षे गैरवापर केल्याचा आरोप आहे. सध्या या आरोपांमधून मादुरो यांची सुटका होते की नाही, बॅरी पोलॅक नेमकं काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर






