मुंबई : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध उपक्रम सुरु आहेत. देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) जवानांनी समुद्रामध्ये तिरंगा (Tiranga In Sea) फडकावला आहे.
“हर घर तिरंगा”#HarGharTiranga
“आज़ादी का अमृत महोत्सव”#AzadiKaAmritMahotsav
As part of 75th years of India’s independence celebration, @IndiaCoastGuard performed underwater flag Demo at Sea. This initiative is to invoke the feeling of patriotism in the hearts of the people. pic.twitter.com/wAOADF2tfX
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) July 29, 2022
भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत जवानांनी समुद्राखाली जाऊन तिरंगा फडकवला आहे. भारतीय तटरक्षक दलाने ‘हर घर तिरंगा अभियाना’चा भाग म्हणून समुद्रात पाण्याखालील ध्वज डेमो (Flag Demo) दिला. या उपक्रमाचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.