संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक अधिकारी प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे. यादरम्यान गेल्या 24 तासांत 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

    हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक अधिकारी प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे. यादरम्यान गेल्या 24 तासांत 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

    या संदर्भात तेलंगणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले की, रविवारी सकाळी 9 ते सोमवारी सकाळी 9 वाजेदरम्यान पोलिसांनी सुमारे 9,63,34,880 रुपये रोख, 4,27,88,147 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, 5,96,250 रुपयांची औषधे जप्त केली. तसेच 25 हजार रुपयांच्या 46 साड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 9 ऑक्टोबरपासून जप्त केलेल्या वस्तू आणि रोख रकमेसह एकूण 724,00,46,454 रुपये जप्त केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित पैसे वाटण्याची योजना आली होती. खम्मम करण्यासाठी आखण्यात जिल्ह्यातील पालेरू विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये पैसे वाटण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये एका घरात ठेवण्यात आले होते.

    माहिती मिळताच आयटी अधिकारी व पोलिसांनी सर्व रक्कम जप्त केली. तसेच पेड्डापल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील एनटीपीसी कृष्णनगर येथून 2,18,90,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.