MI Vs CSK Live Streaming (फोटो - ट्विटर)
मुकेश चौधरीच्या आईचे दु:खद निधन
पहिल्याच ओव्हर्समध्ये पटकावली डी-कॉकची विकेट
चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला आणले अडचणीत
Tata IPL 2026 MI Vs CSK Live Updates: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या दोन संघांमध्ये महामुकाबला सुरू आहे. मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने आले आहेत. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 207 रन्स करून मुंबईला 208 रन्सचे टार्गेट दिले होते. दरम्यान आज चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकुल चौधरीने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली. मुकेश चौधरीने विकेट घेताच वानखेडे गहिवरलं. नेमका हा विषय काय आहे ते जाणून घेऊयात.
सामना सुरू होण्याच्या आधी चेन्नईची प्लेइंग 11 पाहून सर्वानाच धक्का बसला. कारण चाहत्यांना त्यामध्ये मुकेश चौधरीचे नाव दिसले. चेन्नईचा गोलंदाज मुकेश चौधरीच्या मातोश्रींचे दु:खद निधन झाले आहे. मात्र तरी देखील मुकेश चौधरी आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गोलंदाजी करताना दिसला. त्याने चेन्नईकडून दुसरी ओव्हर टाकली.
मुकेश चौधरीच्या आईचे 21 तारखेला दु: खद निधन झाले. त्यानंतर लगेचच मुकेश चौधरी आपले गाव असलेल्या भिलवाडा येथे परतला होता. त्यानंतर मुकेश आज मुंबई विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात चेन्नईच्या संघासोबत हजर होता. चेन्नईच्या संघाकडून आणि सोशल मिडियावर मुकेश चौधरीच्या कृतीचे कौतुक केले जात आहे.
मुकेश पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पटकावली आहे. मुकेशने चेन्नईची दुसरी आणि आपली पहिली ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये त्याने डी कॉकला एकूण 4 बॉल डॉट टाकले. 5 व्या बॉलवर त्याने डी कॉकला स्टंप आउट केले. त्याने या दु:खात देखील आपले कर्तव्य पार पाडल्याने सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…






