दिल्ली : देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. वायव्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने किमान पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात 25 हून अधिक शहरांत पारा 41 अंशाच्या वर सरकला असून बुधवारी ब्रह्मपुरी आणि वर्धा शहरांत तापमान 45 अंशावर होते(25 cities in India scorched by scorching heat).
भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील किमान पाच दिवस देशातील मोठ्या भागात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागेल. त्याच वेळी, पुढील तीन दिवसांत, वायव्य भारतातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. दिलासा देणारी बाब म्हणजे तापमानात वाढ झाल्यानंतर तापमानात 2 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यताही आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. 1 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान 47-48 अंशावर जाण्याची शक्यता आहे. 2 मेपासून मात्र तापमानात घट होईल.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लोकही उष्णतेमुळे अतिशय वाईट स्थितीत आहेत आणि येथेही पारा वाढत आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
राजस्थानमधील कारखान्यांसाठी चार तासांचा वीजकपात निश्चित करण्यात आली आहे. जूनमध्ये मान्सूनच्या अपेक्षित आगमनापूर्वी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ओडिशातही बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी लोकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला असून कडक उन्हामुळे राज्यातील सर्व शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील शैक्षणिक संस्थांमध्ये उन्हाळी सुट्ट्या वेळेपूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]