झारखंडच्या गिरिडीहमध्ये भीषण रस्ता अपघात, पाच जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी!

निवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बाघमारा येथे गाडीतील १० जण लग्न समारंभातून परतत असताना हा अपघात झाला.

    नैनितालमध्ये शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मोठा अपघात झाला. नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक जीप ५०० मीटर खड्ड्यात पडून नऊ जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहे. ही घटना ताजी असतानाच आता झारखंडमधून अपघाताची घटना (Jharkhand Accident) समोर आली आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघाता कार अक्षरश: चुराडा झाला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

    कसा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बाघमारा येथे गाडीतील १० जण लग्न समारंभातून परतत असताना हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ एका झाडावर आदळली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून लोकांना गाडीतून बाहेर काढले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.

    चालकाला डुलकी लागल्याने अपघात?

    गिरिडीह सदर उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अनिल सिंह यांनी सांगितले की , कारमधील लोक बिरनी पोलीस स्टेशन हद्दीतील थोरिया गावापासून 40 किमी अंतरावर असलेल्या तिकोडीह येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते आणि घरी परतत असताना हा अपघात झाला. “पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि उर्वरित पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  . मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.