आपल्या पदार्पणाच्या सामन्यानंतर, वैभवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, ‘तुमच्या सर्व संदेशांनी मी भारावून गेलो आहे. माझ्या वरिष्ठांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी आभार मानू इच्छितो. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मीखरोखरच कृतज्ञ आहे. मी माझ्या संघासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.’
Vaibhav Sooryavanshi Thanking all the fans for the support 😍❤️ pic.twitter.com/FQ8VxhWagY — Johns. (@CricCrazyJohns) July 5, 2026
ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्मासोबत टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली. जेव्हा वैभवने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी फिरकी गोलंदाजाला फटका मारण्याच्या प्रयत्नात तो स्टम्प आउट झाला आणि १४ धावांवर बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १९० धावा केल्या, ज्या इंग्लंडने १९ षटकांत पूर्ण करून ४ विकेट्सने विजय मिळवला.
वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजी करताना केवळ १४ धावा केल्या असल्या तरी, त्याच्या दोन षटकारांपैकी एक षटकार जोफ्रा आर्चरविरुद्ध होता. मात्र, एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. आता ७ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील, जिथे त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.






