हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना! कार दुरुस्तीदरम्यान केमिकला लागली भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

हैदराबादमधील नामपल्ली परिसरात एका निवासी इमारतीमध्ये गाडीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी शेजारी ठेवलेल्या केमिकलने पेट घेतला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाले आहेत.

    गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापुर्वी मुंबईतील दादर परिसरातील एका इमारतीतील पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने 16 वाहने जळून खाक झाली होती आता अशीच एक घटना हैदराबादमधून उघडकीस आली आहे. हैदराबादमधील (Hyderabad Fire News) नामपल्ली परिसरात एका निवासी इमारतीमध्ये गाडीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी शेजारी ठेवलेल्या केमिकलने पेट घेतला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाले आहेत.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये नेमपल्ली परिसरात ही आग लागली. ही आग सकाळी ९.३५ वाजता लागली. या भागात असलेल्या इमारतीमध्ये रसायने ठेवण्यात आली होती. त्यामुळे भीषण आग लागली. कारमध्ये दुरुस्ती सुरू रसायन ठेवलेल्या ठिकाणी असताना ठिणगी पडली आणि आग लागली. पाहता पाहत या आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    बचावकार्य सुरू

    अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवून इमारतीतील लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.