उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांच्या गाडीचा आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Varanasi Accident News) झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”शाहरुख खानच्या स्वदेशची अभिनेत्री गायत्री जोशीच्या इटलीत कार अपघात, 1 स्विस जोडप्याचा मृत्यू, Video viral! https://www.navarashtra.com/movies/shahrukh-khan-swades-actress-gayatri-joshi-met-with-an-car-accident-italy-nrps-465408.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलीभीत येथील एक कुटुंब वाराणसीत दर्शनासाठी आले होते. हे लोकं दर्शन करून जौनपूरला परतत असताना वाराणसी-जौनपूर महामार्गावर त्यांची कार एका ट्रकवर आदळली. अपघातानंतर सर्वात आधी स्थानिक लोक मदतीसाठी पोहोचले. त्यांनी गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह वाहनातून बाहेर काढले. या आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये विपिन यादव आणि त्यांची आई गंगा यादव, रा.रुद्रपूर, माधोतांडा पोलीस स्टेशन, पिलीभीत, महेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी चंद्रकाली, राजेंद्र यादव, रा.रुद्रपूर, अशी मृतांची नावे आहेत. धर्मगडपूर, माधोतांडा यांचा समावेश आहे. तर, अन्य मृतांची ओळख पटू शकली नाही.
या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडीचा दरवाजा रॉडने तोडावा लागला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेह सहजासहजी बाहेर काढता आला नाही. गाडीच्या पुढील व मध्यभागी बसलेल्या लोकांचे मृतदेह कारचे काही भाग कापून बाहेर काढता आले. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी यांनी ट्विटद्वारे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्यास सांगितले आहे. त्यांनी बाबा विश्वनाथ यांच्याकडे मृतांच्या आत्म्याला शांती आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.या अपघाताचे कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.