कर्नाल : हरियाणातील (Haryana) कर्नालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तरवाडी येथील शिवशक्ती राईस मिलची तीन मजली इमारत मंगळवारी पहाटे कोसळली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. अपघात झाला तेव्हा इमारतीत अनेक मजूर झोपले होते, ते सर्वजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
[read_also content=”धक्कादायक! अमेरिकेत 6 शिक्षिका करत होत्या अल्पवयीन मुलांच लैंगिक शोषण,अखेर बिंग फुटलं, सगळ्या जणींना अटक https://www.navarashtra.com/crime/us-female-teacher-arrested-for-molesting-student-in-school-nrps-386659.html”]
राइस मिलच्या तीन मजली इमारतीत 200 मजूर राहत असल्याची माहिती मिळाली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि सामाजिक संस्था घटनास्थळी पोहोचल्या. मदत आणि बचाव कार्य सुरू केले आणि ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढले. इमारत कोसळण्यामागची कारणे सध्या तरी उघड झालेली नाहीत.
[read_also content=”पत्ता चुकल्याने गेला भलत्याचं घरी, Doorbell वाजवल्याने मिळाली एवढी भीषण शिक्षा, आता देतोय जीवन-मरणाशी झुंज https://www.navarashtra.com/world/a-man-shot-a-child-in-america-as-was-ringing-his-doorbell-nrps-386668.html”]
एसपी कर्नाल शशांक कुमार म्हणाले की, अत्यंत दुःखद घटना घडली आहे, कारवाई केली जाईल. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही बचावकार्य सुरू केले आहे, डॉक्टर घटनास्थळी पोहोचले आहेत आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 20 जण जखमी असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. डेब्रिज काढले जात आहे. समितीच्या अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.






