दिल्लीतली सरकार दारु घोटाळ्यात अडचणीत सापडली आहे. सरकारचे अनेक नेते तुरुंगात जात आहेत. आता आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह हे अडचणीत आले आहेत.
दिल्ली: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह यांना ईडीने (ED) आज अटक केली आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या (Delhi Liquor Scam Case) प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ईडीकडून आज सकाळपासून संजय सिंह यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता अखेर संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. (Rajya Sabha MP Sanjay Singh)
दिल्लीतली सरकार दारु घोटाळ्यात अडचणीत सापडली आहे. सरकारचे अनेक नेते तुरुंगात जात आहेत. आता आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह हे अडचणीत आले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED Raid) संजय सिंह यांच्या दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू भागातल्या बंगल्यावर छापा टाकला. ही कारवाई सुरु असताना खासदार संजय सिंह यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा पहारा सुरु आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्याची पाळंमुळं खणण्यासाठी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या ईडीच्या कारवाईने वाद पेटण्याची शक्यता आहे.