कोलकाता नाईट रायडर्सने पोडला गुजरात टायटन्सना घाम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, तर कोलकाताने एक बदल केला. या सामन्यावर पावसाचे सावट आहे, मात्र तो अद्याप आलेला नाही. ज्यामुळे पहिली खेळी चांगली खेळण्यात आली आहे. गुजरात हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.
KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे
कोलकाताची खेळी
मोहम्मद सिराजने अजिंक्य रहाणेला बाद करून कोलकाताला पहिला धक्का दिला. रहाणे १४ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करून बाद झाला. कोलकाताची धावसंख्या ४४ धावांवर एक गडी बाद अशी होती मात्र त्यानंतर फिन ॲलनने धुरा सांभाळली आणि तुफानी खेळी केली. आज कोलकाताच्या टीमने गुजरातच्या टीमची हवा काढली असेच चित्र दिसून आले.
कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर फिन ॲलन संघाविरुद्ध शानदार फलंदाजी करत ९३ धावा केल्या मात्र तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही आणि त्याचा झेल रशिदने सीमारेषेजवळ पकडला. यानंतर अंगकृश रघुवंशीने धुरा सांभाळली आणि सतत ६ मारत धावांचा पाऊस पाडला आणि नॉट आऊट राहत रघुवंशीने तब्बल ८२ धावांची खेळी केली. केकेआरने गुजरात टायटन्सविरुद्ध २० षटकांत २४७ धावा केल्या. या डावात केकेआरच्या केवळ दोन विकेट पडल्या
The Curse Of The Crimson Jinx: पंजाब तोडणार का चक्रव्यूह? की करणार इतिहासाची पुनरावृत्ती
३३ बॉल्समध्ये रघुवंशीचे अर्धशतक
अंगक्रिश रघुवंशीने ३३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे त्याचे सातवे आणि या हंगामातील पाचवे अर्धशतक आहे. दरम्यान कोलकाताने आज गुजरातविरूद्ध खूपच चांगली खेळी करत त्यांच्यासमोर चांगलाच धावांचा डोंगर उभारला आहे. आता गुजरातचे फलंदाज कसे खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातला आपले अव्वल स्थान टिकवत प्लेऑफमध्ये आजच जाण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कोलकाता प्लेऑफमध्ये आपल्या टीमचे स्थान भक्कम करण्यासाठी लढणार आहे.






