17 दिवसांनंतर अखेर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका!

    तब्बल  17 दिवसापासून उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarakashi tunnel rescue) अडकलेल्या  41 मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम टप्प्यात रॅट-होल मायनर्स तैनात करण्यात आले होते. त्यांनी भंगारात मॅन्युअली ड्रिलिंग करून बोगद्यात 800 मिमी पाईप टाकले. त्यानंतर सर्व कामगारांना मंगळवारी रात्री बाहेर काढण्यात आले.  हे सर्व कामगार उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

    17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका करणारे ऑपरेशन सिल्क्यरा हे बोगद्यामध्ये किंवा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे देशातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले आहे. यापूर्वी १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा खाणीतून ६५ कामगारांना दोन दिवस चाललेल्या ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

    ही मोहीम आपल्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्यासाठी देशभरातील आणि जगभरातील तज्ज्ञांनी रात्रंदिवस काम केले. 13 नोव्हेंबर 1989 रोजी पश्चिम बंगालमधील महाबीर कोलियरी राणीगंज कोळसा खाण पाण्याखाली गेली. यामध्ये 65 मजूर अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी खाण अभियंता जसवंत गिल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

    पाण्याने भरलेल्या खाणीत सात फूट उंच आणि 22 इंच व्यासाची स्टीलची कॅप्सूल पाठवण्यासाठी नवीन बोअरहोल बांधण्याची कल्पना त्याला सुचली. दोन दिवसांच्या ऑपरेशननंतर अखेर सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्या ऑपरेशनमध्ये गिल स्वतः स्टीलच्या कॅप्सूलमधून खाणीच्या आत जाऊन लोकांना वाचवले.