SRH Vs DC Live Streaming (फोटो- ट्विटर)
दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू आहे सामना
अभिषेक शर्माने लगावले शानदार शतक
Tata IPL 2026 DC Vs SRH Live Updates: हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आज एसआरएच विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने (IPL 2026) टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्माने शतकी खेळी केली. दरम्यान एसआरएचने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 243 रन्सचे टार्गेट दिले आहे.
एसआरएचची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर एसआरएचकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी सुरुवात केली. दोघांनी हैदराबादच्या डावाची चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये शर्मा आणि हेडने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. दरम्यान मोठा फटका मारण्याच्या नादात ट्रेविस हेड 37 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार इशान किशनने अभिषेक शर्माला चांगली साथ दिली.
इशान किशनने 25 रन्स करून अभिषेक शर्माची साथ दिली. तर हेनरी क्लासेनने 37 रन्सची अत्यंत महत्वपूर्ण खेळी केली. तर अभिषेक शर्माने 143 रन्सची नाबाद खेळी केली. यामुळे हैदराबादच्या संघाने 242 रन्सचा टप्पा गाठला आणि दिल्लीला भलेमोठे आव्हान दिले.
अभिषेक शर्माचे वादळी शतक
अभिषेक शर्मा हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी 2,000 हून अधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यासोबतच त्याने तुफानी शतक देखील ठोकले आहे. मंगळवारी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL 2026 च्या 31 व्या सामन्यादरम्यान त्याने हा टप्पा गाठला. या सामन्यापूर्वी, या आक्रमक सलामीच्या फलंदाजाने IPL च्या इतिहासात SRH साठी 1941 धावा केल्या होत्या.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची एसआरएचच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली आहे. मुकेश कुमार नितीश राणाला झोडपून काढले. कुलदीप यादवने देखील 2 ओव्हर्समध्ये 30 रन्स दिले. मात्र कर्णधार अक्षर पटेलने 2 ओव्हर्समध्ये 23 रन्स देऊन ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली.
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन.
IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.






