अखेर पाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा, भारताकडे मागितली तदत
बलोच स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात एक मोठा वळण घेणारी घटना बुधवारी घडली. बलोच नेता मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. गेली कित्येक दशके चाललेला हिंसाचार, जबरदस्तीने नागरिकांचं अपहरण आणि मानवाधिकारांच्या भीषण उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर बलूच जनतेने हे निर्णायक पाऊल उचललेलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून एक भावनिक संदेश दिला आहे. “तुम्ही आम्हाला ठार कराल, पण आम्ही राखेतूनही उठून उभे राहू, कारण आमचं मिशन आहे आमच्या वंशाचं रक्षण करणं.” असं म्हणत त्यांनी भारतासह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मदतीचे आणि समर्थनाचे आवाहन केलं.
मीर यार बलोच यांनी भारतीय मीडिया, युट्यूबर्स आणि विचारवंतांना आवाहन केलं की, त्यांनी बलूच लोकांना ‘पाकिस्तानचे आपले लोक’ म्हणणे थांबवावे. त्यांच्या मते, बलूच लोक स्वतःला पाकिस्तानी नव्हे तर बलूचिस्तानी समजतात. “पाकिस्तानी लोक म्हणजे पंजाबी, ज्यांनी कधीच हवाई बॉम्बहल्ले, जबरदस्तीच्या बेपत्ता घटना किंवा नरसंहाराचा सामना केला नाही.”
मीर यार बलोच यांनी भारताच्या पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) संदर्भातील भूमिकेचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी 14 मे 2025 रोजी भारताने पीओके रिकामा करण्यासाठी पाकिस्तानवर दिलेल्या मागणीला समर्थन दिलं आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर दबाव टाकून पीओके त्वरित सोडण्याची मागणी करावी. ते म्हणाले की, जर पाकिस्तानने ऐकलं नाही, तर 1971 मध्ये ढाक्यामध्ये जसे 93000 सैनिकांनी शरणागती पत्करली होती, तशीच आणखी एक लाजिरवाणी हार पाकिस्तानी जनरल्समुळे होईल.
बलूचिस्तानमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून भीषण परिस्थितीत जीवन जगत आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीची बेपत्ता करणे, खोट्या चकमकी, आणि विरोधकांच्या आवाजाचा दमन यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. या परिस्थितीसाठी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांसोबतच स्थानिक सशस्त्र गटही जबाबदार असल्याचे सांगितले जाते. या संघर्षात सर्वसामान्य नागरिक भरडले जात असून, तिथे ना स्वातंत्र्य मीडिया आहे ना न्याय व्यवस्था.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा खतरनाक लीडर ठार? कोण आहे मुहम्मद सिनवार?
आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
आपल्या घोषणेत मीर यार बलोच यांनी भारत आणि जागतिक समुदायाकडे कळकळीचं आवाहन केलं आहे की, त्यांनी बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यावी आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना समर्थन देऊ नये. त्यांच्या म्हणण्यानुसार, बलूचिस्तानचा पाकिस्तानमध्ये समावेश हा बळजबरीने आणि परकीय शक्तींच्या संगनमताने करण्यात आला होता. ही घोषणा बलूचिस्तानच्या इतिहासात एक निर्णायक वळण आहे. आता जागतिक समुदायावर जबाबदारी आहे की, ते मानवी मूल्यांचं समर्थन करत या लढ्याला योग्य न्याय देतील.