पाकिस्तानसह चीनही कापेल थरथर; भारतीय लष्करात आता लवकरच 'हे' कमांडो होणार दाखल
नवी दिल्ली : भारताच्या जवळील देश असलेल्या पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसणार आहे. कारण, सीमेवर जलद हल्ला करण्यासाठी भारतीय सैन्य भैरव कमांडो बटालियनची स्थापना करत आहे. सुरुवातीला अशा पाच बटालियनची स्थापना केली जात आहे. प्रत्येक बटालियनमध्ये 250 विशेष प्रशिक्षित आणि सुसज्ज कमांडो असतील. भारतीय सैन्याचे 31 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या पाच तुकड्या तयार करण्याची योजना आहे.
पाकिस्तान असो वा चीन या देशांतील शत्रूंना सीमेवर चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य 23 भैरव बटालियन तयार करणार आहे. सैन्याकडे सध्या 415 पायदळ बटालियन आहेत, ज्यातून सैनिक घेऊन या भैरव बटालियन तयार केल्या जातील. या बटालियन नियमित पायदळ आणि विशेष दलांमधील अंतर भरून काढतील. या तुकड्या नवीनतम शस्त्रे, उपकरणे आणि ड्रोनने सुसज्ज असतील. ते कठीण परिस्थितीत जलदगतीने काम करण्यास आणि काम करण्यास सज्ज असतील.
पहिल्या पाच बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत सैन्यात सामील होतील, असे सांगण्यात आले आहे. पहिल्या पाच भैरव बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत भारतीय सैन्यात सामील होतील. पहिल्या पाच ‘भैरव’ युनिट्सपैकी तीन नॉर्दर्न कमांड अंतर्गत तयार केले जात आहेत. एक युनिट लेहमधील 14 व्या कॉर्प्ससाठी, 15 व्या कॉर्प्स श्रीनगरमध्ये आणि 16 व्या कॉर्प्ससाठी नागरोटामध्ये असेल. चौथे युनिट पश्चिम सेक्टरच्या वाळवंटात आणि पाचवे पूर्व सेक्टरच्या डोंगराळ भागात असणार आहे. याबाबतची माहिती आता दिली जात आहे.
एका बटालियनमध्ये असतील 7-8 अधिकारी
हे युनिट्स सैन्याच्या 10 पॅरा-स्पेशल फोर्सेस आणि पाच पॅरा (एअरबोर्न) बटालियन व्यतिरिक्त असतील. विशेष दल कठीण मोहिमांवर काम करतात. ‘भैरव’ बटालियनच्या स्थापनेमुळे, विशेष दल त्यांच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. भैरव बटालियनमध्ये सात-आठ अधिकारी असतील.
विशेष दल शत्रूवर करतील मात
भैरव कमांडोंना दोन-तीन महिने प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर, त्यांना एक महिन्यासाठी विशेष दलाच्या युनिटशी जोडले जाईल. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, ‘विशेष दल त्यांच्या वेग, पोहोच आणि विशेष क्षमतेमुळे शत्रूवर मात करू शकतील’.
हेदेखील वाचा : Who is Mohan Bhagwat: वेटेनरी सायंसच्या शिक्षणापासून RSSच्या सरसंघचालकापर्यंत; कसा आहे मोहन भागवतांचा प्रवास?