नागाचे चिन्ह अन् 'भैरव अदम्य' ; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेली नवी भैरव बटालियन नेमकी आहे तरी काय
Chandrapur News: चंद्रपूर महापौरपदाचा पेच कायम! उबाठा-वंचित गट नोंदणीने वाढली काँग्रेसची डोकेदुखी,
गेल्या वर्षी, भारतीय सैन्याने तीन नवीन बटालियन तयार केल्या, त्यापैकी एक भैरव बटालियन होती. प्रत्येक बटालियनमध्ये अंदाजे २५० सैनिक असतात. सध्या १५ बटालियन तयार करण्यात आल्या आहेत, तर आणखी २५ बटालियन तयार करण्याची योजना आहे. शीख लाईट इन्फंट्रीच्या जाज्वल्य वारशातून आकाराला आलेली ही बटालियन आज प्रगत तंत्रज्ञान, अजोड धैर्य आणि शिस्तीचे प्रतीक बनली आहे. लढाऊ उत्कृष्टतेमध्ये अग्रस्थानी असलेल्या या बटालियनला “भैरव” हे नाव देण्यात आले आहे.
भगवान शिवाच्या शक्तिशाली आणि संरक्षणात्मक रूपापासून प्रेरित होऊन हे नाव ठेवण्यात आले असून, ते बटालियनच्या अदम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवते. आधुनिक युद्धातील प्रगत तंत्रज्ञानाची जोड आणि परंपरेतून आलेली लढाऊ वृत्ती यामुळे या तुकडीने लष्करामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भारतीय लष्कराची ‘भैरव’ बटालियन आपल्या नावाप्रमाणेच शत्रूसाठी कर्दनकाळ मानली जाते. या बटालियनच्या चिन्हावर (Insignia) एका आक्रमक नागाचे चित्रण असून त्यासोबत “भैरव, अदम्य” असा शिलालेख कोरण्यात आला आहे.बटालियनच्या टीम कमांडरने या चिन्हाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, नागाचे चित्रण हे शत्रूसाठी सूचक इशारा आहे. ज्याप्रमाणे नागाचा दंश जीवघेणा असतो, त्याचप्रमाणे या बटालियनने शत्रूवर प्रहार केल्यास त्यांचा मृत्यू निश्चित आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि शीख लाईट इन्फंट्रीचा वारसा लाभलेली ही तुकडी शत्रूच्या गोटात धडकी भरवणारी ‘अदम्य’ शक्ती म्हणून ओळखली जात आहे.
भैरव बटालियनचे सैनिक जेव्हा युद्धभूमीवर उतरतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील लाल आणि गडद हिरव्या रंगाचे पट्टे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शत्रूला चकवण्यासाठी आणि स्वतःला अदृश्य ठेवण्यासाठी वापरले जाणारे हे विशेष ‘कॅमफ्लाज’ तंत्र या बटालियनच्या लढाऊ कौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे.
हे रंग प्रामुख्याने काळ्या आणि गडद हिरव्या रंगाचे विविध प्रकार असून, त्यांचा वापर रात्रीच्या वेळी किंवा डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगलात शत्रूच्या नजरेतून वाचण्यासाठी केला जातो. जगभरातील विशेष दले आणि कमांडो याच पद्धतीचा वापर करतात, जेणेकरून ऑपरेशन दरम्यान शत्रूला सैनिकांची हालचाल सहज टिपता येऊ नये आणि त्यांच्यावर अचानक (Surprise Attack) हल्ला करता यावा. शत्रूसाठी ‘संकट’ ठरणाऱ्या भैरव बटालियनचे हे रूप त्यांच्या घातक रणनीतीचा पुरावा मानले जात आहे.
नवी दिल्ली: भैरव बटालियनचे कमांडो ऑपरेशनवर जाताना आपल्या चेहऱ्यावर काळ्या आणि लाल रंगाचे पट्टे का लावतात, यामागचे अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक कारण समोर आले आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर अरुण सहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ वेषांतराचा भाग नसून एक आधुनिक धोरणात्मक निर्णय आहे.
सध्याच्या युद्धतंत्रात एआय-आधारित (AI-based) प्रगत सेन्सर्सचा वापर वाढला आहे. हे सेन्सर्स एखादी व्यक्ती मास्क लावून किंवा चेहरा झाकून असली तरीही तिची ओळख पटवू शकतात. मात्र, चेहऱ्यावर काळ्या किंवा लाल तेलाच्या रंगाचा जाड थर लावल्यामुळे या अत्याधुनिक सेन्सर्सना चेहरे ओळखण्यात अडथळे येतात. शत्रूच्या तांत्रिक पाळतीतून वाचण्यासाठी आणि गुप्त मोहिमा यशस्वी करण्यासाठी भैरव बटालियन या विशेष ‘कॅमफ्लाज’ तंत्राचा वापर करत आहे.






