कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सरकारकडून शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. नेझल कोरोना वॅक्सिन (nostril vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या वापराला परवानगी दिल्यानंतर आता iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लस कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
[read_also content=”तुनिशा शर्मा होती गरोदर? प्रियकराने लग्नास नकार दिला मग उदासिन असल्याने घेतला टोकाचा निर्णय? https://www.navarashtra.com/movies/shocking-news-omg-tunisha-sharma-was-pregnant-her-boyfriend-refused-to-marry-her-then-she-took-an-extreme-decision-due-to-depression-nrvb-356523.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली होती. त्याआधी DGCI ने ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन ॲपवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यात येईल. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होईल