Photo Credit- Social Media बड्या उद्योजकांनी बँकांचे ११ लाख कोटी थकवले; सरकारची संसदेत कबुली
मुंबई: देशातील बँकांचे सुमारे ११ लाख कोटी रुपये थकीत आहेत, यामध्ये उद्योगपती आणि व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली. मात्र, कोणत्या बँकेकडून कोणत्या कंपनीने किंवा उद्योगपतीने नेमकी किती रक्कम थकवली आहे, याचा तपशील सार्वजनिक डोमेनमध्ये किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालांमध्ये सहसा जाहीर केला जात नाही, असे बँकेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
या माहितीचा बँकिंग व्यवस्थेवर आणि बाजारातील विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून आरबीआय आणि सरकार अशी संवेदनशील माहिती गोपनीय ठेवतात. यासाठी बँकिंग नियम रेग्युलेशन अॅक्ट १९४९ आणि गोपनीयता धोरणांचा आधार घेतला जातो. असे असले तरी वित्त मंत्रालय आणि आरबीआयच्या काही टिपण्णीतून ही माहिती समोर आली आहे.
ट्रम्प यांचा टॅरिफवर ‘यू-टर्न’, चीनसह अन्याय्य व्यापार करणाऱ्या ‘या’ देशांना अजिबात सवलत नाही
मार्च २०२३ पर्यंत सार्वजनिक आणि खासगी बँकांचा एकूण एनपीए अर्थात थकीत कर्ज सुमारे ११ लाख कोटी रुपये होते, ज्यामध्ये कॉर्पोरेट काँचा मोठा वाटा आहे. यातील बहुतांश कर्ज मोठे उद्योगपती आणि कॉर्पोरेट समूहांनी घेतले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए ७.३% तर खासगी बँकांचा एनपीए ३.९% होता. BANIC थकीत कर्जामध्ये पायाभूत सुविधा, ऊर्जा, पोलाद, विमान, आणि रियल इस्टेट यासारख्या क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. यात भूषण स्टील, एस्सार स्टील, जेपी इन्फ्राटेक, आयएलअँडएफएस आणि जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया: सर्वात मोठी सार्वजनिक बैंक असल्याने यांचे थकीत कर्ज सर्वाधिक म्हणजे अंदाजे २ ते ३ लाख कोटी रुपये आहे.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) : फसवणूक आणि डिफॉल्टमुळे सुमारे ८० हजार कोटी रुपये थकले.
बैंक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि इतर बँकांचेही कॉर्पोरेट कर्जामुळे मोठे नुकसान झाले आहे.
Mehul Choksi Arrested: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची
विजय मल्या : किंगफिशर एअरलाइन्समुळे सुमारे ९ हजार कोटी रुपये थकवले. यामध्ये स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि इतर बँकांचा समावेश आहे.
निरव मोदी आणि मेहुल चोक्सी: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सुमारे १४ हजार कोटी रुपये थकवले.
आयएलॲडएफएस : या कंपनीच्या डिफॉल्टमुळे ९१ हजार कोटी रुपये थकले, ज्याचा अनेक बँकांना मोठा फटका बसला.
अनिल अंबानी: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर उपकंपन्यांमुळे सुमारे ४० हजार कोटी रुपये थकले.
धीरुभाई अंबानी इन्फ्रास्ट्रक्चर : या कंपनीनेही २० हजार कोटींहून अधिक कर्ज थकवले आहे