Photo Credit- Social Media मोठी बातमी! पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक
पंजाब: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज (4 मे) १२ दिवस झाले. मागील १२ दिवसांत भारत आणि पाकिस्तानातील संबंध फारच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी सातत्याने लष्करप्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत बैठका घेत आहेत. कालही त्यांनी नौदल प्रमुखांसोबत बैठक घेतली. या मॅरेथॉन बैठका सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पंजाबमधील अमृतसर पोलिसांनी आजच दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पंजाबमधील लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे परदेशात पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी या दोघांची ओळख पटली आहे. आरोपींनी लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो शत्रूला पाठवले आहेत. प्राथमिक तपासानुसार असे दिसून आले आहे की त्याचे पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संबंध आहेत, जे हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपी द्वारे स्थापित झाले आहेत. हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू सध्या अमृतसर मध्यवर्ती कारागृहात आहे.
Ahmednagar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुरूंग? बड्या नेत्याने घेतली राम शिंदेंची भेट
दरम्यान, रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शनिवारी रशियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर इस्लामाबाद पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानने सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला आहे. शनिवारी पाकिस्तानने कुपवाडा, उरी आणि अखनूर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या गोपनियतेच्या कायद्यांतर्गत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आहे. तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, अशी अपेक्षा आहे. पंजाब पोलिस भारतीय सैन्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात ठाम आहेत. आपल्या सशस्त्र दलांच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडक आणि त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.