Photo Credit- Social Media सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या नारायण चौडा यांचा मोठा खुलासा
पंजाब: शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरांच्या प्रवेश द्वारासमोर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पंजाबमधी राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात हल्लेखोर नारायण सिंह चौरा याला पोलिसांनी अटक केली आहे. अशातच सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यासाठी चौरा गेल्या सहा महिन्यांपासून प्लॅनिंग करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
आज (4 डिसेंबर) सकाळी सुखबीर सिंग बादल सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पहारा देत असताना चौरा अचानक तिथे आला आणि थेट त्यांच्यावर गोळीबार करणार इतक्यात दुसऱ्या एका व्यक्तीने त्याला हल्ला करण्यापासून रोखले. त्याने झाडलेली गोळी हवेत फायर झाली. त्यामुळे सुखबीरसिंग या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याचवेळी चौरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौरा याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्णमंदिराबाहेर गोळीबार
नारायण सिंह चौरा याने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की, शीख समुदायाने अकाली दलाला त्याच्या जघन्य गुन्ह्यांमुळे राजकीय पटलावरून गायब केले आहे आणि अकाल तख्त साहिबच्या मदतीने ते आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवू इच्छित आहे. नाराज गटाने यासंदर्भात जथेदार ग्यानी रघबीर सिंह यांना पत्रही लिहिले आहे. खालसा पंथाने याची दखल घ्यावी.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांचे गुन्हे इतके जघन्य आहेत की या पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय दबाव निर्माण केला आणि जथेदारांच्या पदाचा गैरवापर केला. याविरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक शीख संघटनेचे धार्मिक कर्तव्य आहे. या जघन्य अपराधांना माफ करता येणार नाही. गुरुपंथाशी गद्दारी करणारा हा पक्ष पंथाचा गद्दार असून राजकीय क्षेत्रात पंथाचे नेतृत्व करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. गुरुपंथाशी गद्दारी करणारा हा पक्ष पंथाचा देशद्रोही असून या पक्षाला राजकीय क्षेत्रात पंथाचे नेतृत्व करण्याचा अधिकार नसून या पक्षाला या क्षेत्रातून नाकारून पंथाने आपले मत व्यक्त केले आहे, असे ते म्हणाले.
हल्लेखोर बब्बर खालसा इंटरनॅशनलचा माजी सदस्य म्हणून ओळखला जातो. तो 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पाकिस्तानमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे. हल्लेखोराने गनिमी काव्यावर एक पुस्तकही लिहिले आहे. तो बुरैल जेलब्रेक प्रकरणातील आरोपी असून त्याने पंजाबच्या तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. शिरोमणी अकाली दलाचे म्हणणे आहे की नारायण सिंह चौरा यांचे भाऊ नरेंद्र सिंह हे डेरा बाबा नानक येथील चौरा बाजार समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते काँग्रेस खासदार सुखजिंदर रंधावा यांच्या जवळचे आहेत.
शीख धर्मगुरूंनी ‘धार्मिक शिक्षा दिल्यानंतर अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवादार’ म्हणून काम केले. आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस होता, आजही ते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपाल म्हणून एका हातात भाला धरून, निळा ‘सेवादार’ गणवेश परिधान करून सेवा देत होते. त्यांच्या त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले ते व्हिलचेअरवर बसूनच आपली सेवा देत होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत अकाली दलाचे दुसरे एक नेते सुखदेव सिंग धिंडसा यांनीही व्हीलचेअरवर बसून ‘सेवादार’ची भूमिका बजावली. धिंडसा हे वृद्ध असल्याने तेदेखील व्हीलचेअरवर होते. याशिवाय पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया आणि दलजित सिंग चीमा यांनी शिक्षेचा भाग म्हणून भांडी धुतली. तसेच, सुखबीर बादल आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गळ्यात छोटे फलक लटकवलेले होते ज्यात त्यांच्या “चुकीची” कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर ‘सेवादार’ म्हणून काम केले.