Bihar Band News: बिहारमधील बंद यशस्वी की अयशस्वी; कशी होती बिहारमधील परिस्थिती
Bihar Band News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबाबत आक्षेपार्ह टिप्पण्णी केल्याच्या विरोधात बिहारमध्ये काल (४ सप्टेंबर) बिहार बंदची हाक देण्यात आली होती. सत्ताधारी आघाडी (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) ने ४ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ‘बिहार बंद’चा परिणाम राज्यभरात दिसून आला. राजधानी पटनासह अनेक शहरांमध्ये एनडीए’चे कार्यकर्ते सकाळपासून रस्त्यावर उतरून निषेध नोंदवताना दिसले. काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, आरजेडीचे खासदार संजय यादव यांनी मात्र, ‘हा बंद पूर्णपणे अयशस्वी झाला आहे आणि बिहारच्या जनतेने राज्यात भाजपचे अस्तित्व नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना संजय यादव म्हणाले की, भाजप नेतेही त्यांच्या मर्यादांचे पालन करत नाहीत. त्यांची विधाने काय सनातनचे मंत्रोच्चार आहेत का? त्यांच्या पक्षातील कोणी काही बोलले तर त्यासाठीही विरोधकांना जबाबदार धरले जाते. हा ढोंगीपणा आता चालणार नाही. पण आता हा खोटारडेपणा आणि शिवीगाळ यांच्या खताने मतांचे पीक कसे तयार केले जाते याचा राजकारणात आता एक नवीन धडा जोडला पाहिजे.
Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’
आरजेडीचे खासदार संजय यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले की, “दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एका सरकारी कार्यक्रमात तब्बल ९० वेळा ‘माँ’ हा शब्द वापरला. बिहारमध्ये हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान आणि सिंदूरचे राजकारण चालले नाही, त्यामुळे आता भावनिक कार्ड खेळले जात आहे. बिहारमध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत, पण पंतप्रधान त्याकडे लक्ष देत नाहीत. तुमच्या सरकारच्या काळात ६५ हजारांहून अधिक हत्या झाल्या, ६,५०० हून अधिक महिलांनी त्यांची मुले गमावली. पण हजारो बहिणींनी आपले पती गमावले, तेव्हा तुम्ही अश्रू ढाळले नाहीत. बेरोजगारांना रस्त्यावर मारहाण होते, तेव्हा तुम्हाला वेदना होत नाहीत. भाजपचे हे नाटकी राजकारण बिहारमध्ये चालणार नाही. येथे केवळ खऱ्या मुद्द्यांवर चर्चा होईल, कृत्रिम मुद्द्यांवर नाही,” असा टोला यादव यांनी लगावला.
दरम्यान, जीएसटी कर स्लॅबमधील बदलाबाबत ते म्हणाले की, या सरकारचे कोणतेही कायमचे धोरण नाही. “नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. जीएसटी लागू झाल्यादिवशीच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता नऊ वर्षांनी सरकारचे डोळे उघडले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था चालवणे भाजपच्या सत्तेत शक्य नाही,” अशी टीका त्यांनी केली.
आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बिहार बंद दरम्यान, जहानाबादमध्ये एका महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करण्यात आली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी महिला शिक्षिकेसोबत वादविवाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, महिला भाजप कार्यकर्त्यां शिक्षिकेला धरून घेऊन जाताना दिसत आहेत. शिक्षिकेने पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केल्याचा आरोप बंद समर्थकांनी केला आहे. त्याच वेळी, शिक्षिकेने म्हटले आहे की तिला शाळेत जाण्यापासून रोखले जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ एनडीएने गुरुवारी बिहार बंदची हाक दिली. जहानाबादमध्येही भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि दुकाने बंद केली आणि निषेध केला. यादरम्यान, शाळेसाठी घरून निघालेल्या दीप्ती राणी नावाच्या शिक्षिकेचा अरवल वळणावरून प्रवास करत असताना तिथे निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला.
आंदोलकांनी शिक्षिकेला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर तिलाही ढकलण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षिकेवर विरोधी पक्षाचा समर्थक असल्याचा आरोप केला. पण दीप्ती राणी यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. आपण कोणत्याही पक्षाची समर्थक नाही. सकाळी शाळेत येत असताना आपल्याला थांबवण्यात आले. याच दरम्यान मला धक्काबुक्की झाली. पण पोलिस आणि प्रशासनाच्या लोकांनी मला या गर्दीतून तिथून सुरक्षित बाहेर काढले आणि ती शाळेत पोहोचली.