भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याच्या चर्चांना ऊत
जोधपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. वसुंधरा राजे आणि मोहन भागवत यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाले सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
धोलपूरमधील रामकथेदरम्यान वसुंधरा यांनी वनवासाबद्दल वक्तव्य केले होते आणि त्यानंतर जोधपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी म्हटले की, ‘देवावर असणाऱ्या अढळ श्रद्धेने कोणतेही काम पूर्ण करता येते. जरी उशीर झाला तरी…’ वसुंधरा राजे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. राजेंच्या या वक्तव्यांनंतर, मोहन भागवत यांच्याशी झालेल्या 20 मिनिटांच्या भेटीमुळे राजे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याच्या अटकळींना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजे या आरएसएसच्या पहिल्या पसंतीच्या आहेत. जर राजे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले गेले तर त्या भाजपच्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असतील. आरएसएस प्रमुख मोहन भागवत सध्या ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय समन्वय बैठकीसाठी जोधपूरमध्ये आहेत. भागवतांना भेटल्यानंतर राजे थेट सुरसागरमधील बडा रामद्वारा येथे पोहोचल्या, जिथे त्यांनी रामस्नेही संत रामप्रसाद जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी धार्मिक चर्चाही केली.
दोघांमध्ये 20 मिनिटे झाली चर्चा
वसुंधराराजे यांनी सुमारे 20 मिनिटे डॉ. भागवत यांच्याशी चर्चा केली. डॉ. भागवत यांच्याशी झालेल्या 20 मिनिटांच्या भेटीत राजे यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. भागवतांना भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.